Sumona Chakravarti : द कपिल शर्मा शो'मध्ये झळकणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला (Sumona Chakravarti) कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुमोनाने लागण झाल्याची माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे.


इंस्टा स्टोरी शेअर करत तिने कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तिने लिहिले आहे, "मला मध्यम लक्षणे जाणवत असून सध्या मी घरीच विलगीकरणात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तिने काळजी घ्यावी तसेच कोरोना चाचणी करावी."



बॉलिवूडला कोरोनाचा विळखा
अभिनेता जॉन  अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल तसेच अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. एकता कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे, सध्या ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. अभिनेता नकुल मेहताला कोरोनाची लागण झाली असून आता त्याच्या मुलाला आणि पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली आहे.


याआधी अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली होती. या अभिनेत्रींनी कोरोना नियमांचं पालन न करता अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे या अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं गेलं. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कातील सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले होते. 


संबंधित बातम्या


Prithviraj Movie Postponed : 'पृथ्वीराज' सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे


Nakuul Mehta : अभिनेता नकुल मेहतानंतर त्याच्या 11 महिन्यांच्या मुलालादेखील कोरोनाची लागण


Prem Chopra : बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रांना कोरोनाची लागण, लीलावती रुग्णालयात दाखल


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha