Kareena Kapoor: अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी पुस्तके लिहिली आहेत ज्यात इंडस्ट्रीच्या न ऐकलेल्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय. करण जोहरचे 'ॲन अनसुटेबल बॉय' हे पुस्तकही असंच एक पुस्तक आहे. या पुस्तकात करणने इंडस्ट्रीमधल्या अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. करण जोहरने (Karan Johar) 2003 मध्ये निर्माता म्हणून एक चित्रपट बनवला होता. त्य सिनेमासाठी अभिनेत्री म्हणून त्याची पहिली पसंती ही करीना कपूरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. पण करिनाने (Kareena Kapoor khan) सिनेमा साइन करण्याआधी काही विशेष मागण्या केल्या त्यामुळे तिच्या हातून हा सिनेमा गेला.
करणने त्याच्या पुस्तकात करीनाचा हाच किस्सा सांगितला आहे. करिनाच्या या मागण्यांमुळे शेवटी तिच्या हातून तो ब्लॉकबास्टर सिनेमा निसटून गेला. त्या सिनेमात त्यानंतर करणने दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केलं. दरम्यान करिनाची ही मागणी मानधनाला धरुन होती. त्यामुळे करणने त्या सिनेमात करिनाला कास्ट केलं नाही.
'कल हो ना हो' मध्ये करिना होती पहिली पसंती
'कल हो ना हो' चित्रपटाचा निर्माता करण जोहर होता. हा चित्रपट निखिल अडवाणीने दिग्दर्शित केला होता. त्यामुळेच जेव्हा करणने करीनाशी संपर्क साधला तेव्हा तिला हा चित्रपट करायचा नव्हता. त्याच्या आधीच्या 'मुझसे दोस्ती करोगे' या चित्रपटाप्रमाणेच नवशिक्या निखिल अडवाणीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपटही फ्लॉप ठरेल, असं तिला वाटत होतं.
अन् करिनाच्या हातून गेला 'कल हो ना हो'
यासोबतच करीना कपूरनेही 'कल हो ना हो'साठी शाहरुख खान इतकंच मानधन मागितलं होतं. करण जोहरने आपल्या पुस्तकात याचा उल्लेख करताना म्हटलं होतं की, त्या काळात त्याची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती आणि तो पैसे देऊ शकत नव्हता. याच कारणामुळे त्याने करिनाला सिनेमात कास्ट केलं नाहीये.
यानंतर करीना कपूर खान आणि करण जोहर यांच्यातील संवादही थांबला. दोघेही जवळपास एक वर्ष बोलले नाहीत पण जेव्हा करणच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा करिनाने त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारणा केली. अशा प्रकारे करण जोहर आणि करीना कपूर खान यांची मैत्री पुन्हा जुळून आली.