Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसमधली (Bigg Boss Marathi New Season) अरबाज (Arbaz Patel) आणि निक्की (Nikki Tamboli) ही जोडी सुरुवातीपासूनच बरीच चर्चेत राहिलीये. त्यांच्या खेळाचं, घरातील वागण्यामुळे प्रेक्षकांचाही त्यांच्यावरचा रोष हा कायम आहे. इतकच नव्हे तर पाचव्या आठवड्यात अरबाज आणि निक्कीमध्ये खटकेही उडाले होते. त्यावेळी अरबाजला संपूर्ण घरानेही पाठिंबा दिला होता. पण त्याच्याच पुढच्या आठवड्यात अरबाज पुन्हा घरातल्यांच्या विरोधात गेला आणि निक्की शेजारी जाऊन बसला. 


अरबाजच्या या वागण्याची आता भाऊच्या धक्क्यावरही चांगलीच शाळा घेतली जाणार आहे. तसेच त्या दोघांच्याही वागण्याची निक्कीलाही मोठी शिक्षा मिळणार आहे. असं असलं तरीही निक्की आणि अरबाजच्या नात्यावर वारंवार चर्चा होतच असते. तसेच बिग बॉसच्या घरात मी कमिटेड असल्याचंही अरबाजने कबुल केलं होतं. पण तरीही त्याचं आणि निक्कीचं वागणं हे अनेकांना न पटणारं आहे. त्यावर त्याच्या गर्लफ्रेंडची पोस्ट चर्चेत आली आणि त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या. आता पुन्हा एकदा अरबाजच्या गर्लफ्रेंडची पोस्ट चर्चेत आली आहे.                                                            


लीझाची पोस्ट नेमकी काय?


लीझाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटलं की, 'मला कुणाबद्दलही कोणती वाईट गोष्ट ऐकायला आवडत नाही. ती गोष्ट मग अरबाज आणि निक्कीबाबत असली तरीही मला ती ऐकायला आवडणार नाही. त्यामुळे जर माझ्याकडे कुणी आलं आणि कुणाबद्दल वाईट बोललं गेलं तर ते मी अजिबातच ऐकून घेणार नाही. त्याचप्रमाणे मी आधी जसं सांगितलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही. हे सगळं देवावर सोडून देऊया. काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, मला खरंच माहित नाही. त्यामुळे कुणालाही वाईट बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही.'


पुढे लीझाने आणखी एक पोस्ट करत म्हटलं की, जर मी कधी माझ्या रिलेशनशिपविषयी बोलले नाही, तर माझ्या ब्रेकअप विषयी तरी का बोलेन. त्यामुळे नक्की अरबाज आणि लीझाचं ब्रेकअप झालं आहे की आणखी काय आहे याविषयी नेटकऱ्यांना संभ्रम निर्माण झालाय.




ही बातमी वाचा : 


Celebrity Ganeshostav 2024 : मंगलमूर्ती मोरया! कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान