Janhvi Kapoor : मागील अनेक महिन्यांपासून ‘देवरा: पार्ट 1’ या सिनेमाची बरीच चर्चा सुरु आहे. कोराताला शिवा लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा येत्य 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमा दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर (Janhvi Kapoor ), सैफ अली खान ही मंडळी पाहायला मिळणार आहेत. नुकतच या सिनेमातलं 'धीरे-धीरे' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्यात जुनियर एनटीआर आणि जान्हवीच्या परफॉर्मन्सने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं. यामधील त्यांच्या जबरदस्त डान्सचीही जोरदार चर्चा होती. यावर आता जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची कमेंट चर्चेत आली आहे.
अनेक महिन्यांपासून जान्हवी कपूर आणि सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारिया यांच्या नात्याच्या चर्चा सुरु आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये ते दोघे एकत्र दिसलेही होते. इतकचं नव्हे तर जान्हवीचे वडील आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनीही त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. पण आता शिखरच्या पोस्टने त्यांचं नातं अधिकृतही केलं असल्याचं म्हटलं जातंय.
सिनेमातलं तिसरं गाणंही प्रदर्शित
दरम्यान देवरा: पार्ट 1 या सिनेमातलं तिसरं गाणं दावूदी हे देखील प्रदर्शित झालं आहे. काहीच दिवसांपूर्वी ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या जबरदस्त डान्सने या गाण्यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्या. त्यामुळे सोशल मीडियावरही हे गाणं चांगलच व्हायरल झालं. इतकच नव्हे त्याची सोशल मीडियावर चर्चाही झाली. याच गाण्यावरील जान्हवीच्या परफॉर्मन्सने जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहारियानेही पोस्ट केली आहे.
शिखरची पोस्ट नेमकी काय?
शिखरने त्याच्या सोशल मीडियावर जान्हवीची पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, 'तुम अप्सरा हों या कोई परी,' तसेच तिच्या डान्सचही त्याने कौतुक केलं आहे. त्यामुळे आता जान्हवीच्या डान्ससोबतच शिखरच्या कमेंटचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु झाली आहे.