एक्स्प्लोर

Kantara: बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा’चं वादळ सुसाट! बिग बजेट चित्रपटांनाही टाकले पिछाडीवर

Kantara : साऊथ चित्रपट ‘कांतारा’ (Kantara) सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. कन्नड भाषेत रिलीज झालेला हा चित्रपट आता हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Kantara : साऊथ चित्रपट ‘कांतारा’ (Kantara) सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. कन्नड भाषेत रिलीज झालेला हा चित्रपट आता हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम रचले आहेत. या चित्रपटाने अनेक बिग बजेट चित्रपटांना पिछाडीवर टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत या चित्रपटाने किच्चा सुदीपचा ‘विक्रांत रोणा’ आणि दिवंगत अभिनेता पुनीत यांच्या ‘जेम्स’ला देखील मागे टाकले आहे.

‘कांतारा’ या चित्रपटाच्या कमाईमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचेल, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘कांतारा’ हा चित्रपट 30 सप्टेंबर’ला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या कमाईचा आलेख हा चढताच आहे. रिलीजच्या 20 दिवसांत या चित्रपटाने 170 कोटींचा टप्पा पार केला आहे.

साऊथच्या सुपरस्टार्सना टाकले मागे!

भारतीय बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाचे कलेक्शन चांगले झाले आहे. भारतात या चित्रपटाने 150 कोटींची कमाई केल्याचे बोलले जात आहे. हे कलेक्शन पाहता या चित्रपटाने बिग बजेट चित्रपटांना देखील मागे टाकल्याचे लक्षात येते. साऊथ स्टार किच्चा सुदीप याच्या ‘विक्रांत रोणा’ या चित्रपटाने 158 कोटींची कमाई केली होती. तर, साऊथचा दिवंगत अभिनेता पुनीत यांचा शेवटचा चित्रपट ‘जेम्स’ने देखील बॉक्स ऑफिसवर 151 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटांना मात देत ‘कांतारा’ने साऊथच्या ‘टॉप 3’ चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे.  या यादीत ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ 2’ हे दोन्ही चित्रपट पहिल्या दोन जागांवर स्थिर आहेत.

हिंदी व्हर्जनलाही मिळतेय जोरदार पसंती

अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने हिंदीतही 11कोटींहून अधिकची कमाई केली आहे. आधी हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, पण नंतर चित्रपटाला मिळालेले अफाट यश पाहून निर्मात्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही त्याचे डबिंग केले. इतर भाषांमध्ये रिलीज झाल्यानंतर ‘कांतारा’च्या कमाईत वाढ झाली आहे. चित्रपटाची कन्नड आवृत्ती ब्लॉकबस्टर ठरली आणि आता इतर भाषांमध्येही या चित्रपटाने आपली चुणूक दाखवली आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget