Kangana Ranaut Tejas Box Office Collection Day 5 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या चर्चेत आहे. कंगनाचा 'तेजस' (Tejas) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे.
'तेजस'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Tejas Box Office Collection)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'तेजस' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.25 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 1.3 कोटी, तिसऱ्या दिवशी 1.2 कोटी, चौथ्या दिवशी 50 लाख आणि पाचव्या दिवशी 35 लाखांची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 4.50 कोटींची कमाई केली आहे. 'तेजस' हा सिनेमा 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'तेजस' या सिनेमाने जगभरात 5.65 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पहिला दिवस : 1.25 कोटी
दुसरा दिवस : 1.3 कोटी
तिसरा दिवस : 1.2 कोटी
चौथा दिवस : 50 लाख
पाचवा दिवस : 35 लाख
एकूण कमाई
कंगनाचा 'तेजस' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. 'तेजस' या सिनेमाला 'लियो','12 वीं फेल','गणपत','फुकरे 3' आणि 'मिशन रानीगंज' या सिनेमांचा सामना करावा लागत आहे. तेजस सिनेमा पाहायला सिनेमागृहात जाणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. रिलीजच्या पाचव्या दिवसाची कमाई ऐकून पंगाक्वीन कंगनाची झोप नक्कीच उडणार आहे.
कंगना रनौतचा 'तेजस' हा सिनेमा रिलीजआधीपासून चर्चेत आहे. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने निराशाजनक कामगिरी केली. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. त्यामुळे कंगना रनौतला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनाचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप होत आहेत.
'तेजस' या सिनेमात कंगनाने तेजस गिल या वैमानिकांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं मात्र कौतुक होत आहे. योगी आदित्यनाथ यांनीदेखील कंगनाच्या तेजसचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केलं होतं. त्यावेळी तेजस सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. 'तेजस' या सिनेमात अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशीष विद्यार्थी आणि विशाख नायर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा प्रेक्षकांना कुठेतरी कंटाळवाणा वाटतो.
कंगनाचे आगामी प्रोजेक्ट (Kangana Ranaut Upcoming Project)
कंगनाचा 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तिचा 'इमरजेंसी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. तेजस हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहेत. या सिनेमात अभिनेत्री वैमानिकाच्या भूमिकेत दिसत आहे. 27 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
संबंधित बातम्या