Shiv Thakare : 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. शिव आता 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhla Jaa) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान माझी लवचिकता परत मिळवणे हे माझे सर्वात मोठे चेलेंज असल्याचं शिव ठाकरे म्हणाला.


शिव ठाकरे 'झलक दिखला जा 11'साठी उत्सुक


शिव ठाकरे सध्या 'झलक दिखला जा 11'साठी स्वत: ला तयार करण्यासाठी खूप उत्सुक आहे. या कार्यक्रमासाठी तो खूप उत्साहित आणि नर्व्हस आहे. जिम बॉडी असलेली मुले डान्स मध्ये चांगली नसतात असा सर्वसाधारण समज आहे. शिवदेखील जिम करतो. पण तरीही डान्समध्ये त्याचा हात कोणीही धरू शकत नाही. 


शिव ठाकरे म्हणातो,"मी आधी डान्सर होतो. आता जिम मध्ये जास्त वजन उचलल्यामुळे माझी लवचिकता कमी झाली आहे. जेव्हा मी जिमला जाण्याची सुरुवात केली, तेव्हा मला मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नव्हते, की वर्कआउट करण्यापूर्वी तुम्हाला लवचिकते साठी वॉर्म अप एक्सरसाइज करावा लागेल."






बिग बॉस सीझन 16 आणि खतरों के खिलाडी सीझन 13 नंतर, झलक दिखला जा सीझन 11 हा शिव ठाकरेचा वर्षातील तिसरा रिअ‍ॅलिटी शो असणार आहे. जो त्याला खऱ्या अर्थाने किंग ऑफ रिअ‍ॅलिटी बनवतो.


'हा' प्रवास फक्त ट्रॉफी जिंकण्यासाठी नाही : शिव ठाकरे


'झलक दिखला जा'च्या प्रवासाबद्दलच्या त्याच्या अपेक्षांबद्दल माहिती देताना शिव ठाकरे म्हणाला, "माझा झलक दिखला जा' हा प्रवास फक्त ट्रॉफी जिंकण्यासाठी सहभागी होण्याचा प्रवास नाही तर डान्स मध्ये सनी देओल कडून टायगर श्रॉफ किंवा हृतिक रोशन बनण्याचा प्रवास आहे,  लवचिकता मिळवणे, डान्स चे विविध प्रकार शिकणे आणि तेथील सामान्य माणसांचे खूप प्रेम मिळवणे आणि माझी कोरिओग्राफर रोमशा सिंग या सर्वांसाठी मला मदत करत आहे."


मिस्टर अनस्टॉपेबल, शिव ठाकरे यांनी झलक दिखला जा या शो ची शूटिंग आधीच सुरू केले आहे कारण हा कार्यक्रम यंदाच्या दिवाळीत प्रसारित होणार असताना  त्याला पडद्यावर नाचताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड भेट ठरणार आहे.


संबंधित बातम्या


Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'च्या 'टॉप 5'मध्ये पोहोचला 'आपला माणूस' शिव ठाकरे! म्हणाला,"आता नव्या मंचाची वाट पाहतोय"