Kangana Ranaut Tejas Special Screening At Lucknow : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या 'तेजस' (Tejas) या सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. आता लखनौत (Lucknow) या सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे. योगी आदित्यनाथदेखील (Yogi Adityanath) या विशेष स्क्रीनिंगला उपस्थित असणार आहेत. 


कंगना रनौतचा 'तेजस' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. पण जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा यासाठी अभिनेत्री मेहनत घेत आहेत. आता 31 ऑक्टोबर 2023 रोजी लखनौमध्ये कंगनाच्या 'तेजस'चं विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं आहे. या विशेष स्क्रीनिंगला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील उपस्थित राहणार आहेत. लखनौतील लोकभवनात हे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे.






कंगनाच्या 'तेजस'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Tejas Movie Box Office Collection)


कंगना रनौतचा तेजस हा सिनेमा 27 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी तेजसने 1.25 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 1.3 कोटी, तिसऱ्या दिवशी 1.20 कोटी आणि चौथ्या दिवशी फक्त 50 लाखांची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 4.25 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 4.8 कोटींचा गल्ला जमवला आहे.


तगडी स्टारकास्ट असलेला 'तेजस'


'तेजस' या सिनेमात अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशीष विद्यार्थी आणि विशाख नायर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा प्रेक्षकांना कुठेतरी कंटाळवाणा वाटतो. जगभरात या सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 2600 तिकीट विकले गेले होते. सर्वेश मारवाहने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सिनेमात कंगना रनौत फायटर प्लेन उडवताना दिसत आहे.


कंगनाचे आगामी प्रोजेक्ट (Kangana Ranaut Upcoming Project)


कंगनाचा 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तिचा 'इमरजेंसी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. तेजस हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहेत. या सिनेमात अभिनेत्री वैमानिकाच्या भूमिकेत दिसत आहे. 27 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 


संबंधित बातम्या


Tejas Box Office Collection : कंगनाच्या 'तेजस'च्या कमाईत दिवसेंदिवस घसरण सुरूच; जाणून घ्या आतापर्यंतची कमाई