Aishwarya Rai Bachchan Birthday: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा (Aishwarya Rai Bachchan) आज 50 वा वाढदिवस आहे. ऐश्वर्या ही तिच्या सौंदर्यानं प्रेक्षकांना घायाळ करते. केवळ देशातच नाही तर परदेशातही ऐश्वर्याचे चाहते आहेत. ऐश्वर्या ही अनेक कारणांमुळे चर्चेत असते. आज ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच तिच्या चित्रपटांबद्दल...


ऐश्वर्या राय बच्चनचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी झाला. ऐश्वर्यानं आर्य विद्या मंदिर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. ऐश्वर्यानं अभिनय क्षेत्राच्या आधी मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ती ऐश्वर्या ही मिस वर्ल्ड 1994 स्पर्धेची विजेती ठरली. ऐश्वर्याच्या सौंदर्याचं अनेक जण कौतुक करत होते. अशाच ऐश्वर्यानं 1997 मध्ये मणिरत्नम यांच्या इरुवर या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ऐश्वर्यानं और प्यार हो गया या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 


अफेअरमुळे चर्चेत होती ऐश्वर्या


ऐश्वर्याचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. ऐश्वर्या आणि अभिनेता सलमान खान यांच्या रिलेशनशिपबाबत आजही चर्चा होतात.  हम दिल दे चुके सनम, हम तुम्हारे हैं सनम या चित्रपटात सलमान आणि ऐश्वर्यानं एकत्र काम केलं होतं.  तसेच ऐश्वर्याचं नाव  विवेक ओबेरॉयसोबत जोडण्यात आलं होतं. पण  2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर ऐश्वर्याच्या अफेअर्सच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला.


लूकमुळे झाली ट्रोल


ऐश्वर्याच्या सौंदर्याचं अनेक लोक कौतुक करतात तर काही लोक तिला लूकमुळे ट्रोल देखील करतात.  ऐश्वर्या ही परदेशातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावते. तसेच अनेक वेळा ती विविध फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक देखील करते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्यानं  पेरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला होता. या शोसाठी ऐश्वर्यानं केलेल्या लूकला अनेकांनी ट्रोल केले. 'ती खरोखरच म्हातारी दिसते आणि तिचे वजन खूप वाढले आहे', असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला ट्रोल केले होते. तसेच कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ऐश्वर्यानं केलेल्या लूकला देखील अनेकांनी ट्रोल केलं होतं.


ऐश्वर्या नाही तर 'ही' अभिनेत्री होणार होती बच्चन कुटुंबाची सून 


काही वर्षांपूर्वी अभिषेकचं नाव हे अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत जोडले जात होते. एवढंच नाहीतर त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला होता. 2002 मधील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  या व्हिडीओमध्ये दिसतंय की, जया बच्चन  या करिश्माच्या नावाचा उल्लेख करताना 'ही माझी होणारी सून' असं म्हणतात.  या व्हिडीओमध्ये  सर्व बच्चन कुटुंब आणि करिश्मा हे एकाच मंचावर दिसले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Abhishek Bachchan : 'ऐश्वर्याला चित्रपट साईन करू दे आणि तू आराध्याची काळजी घे', नेटकऱ्याचा सल्ला; अभिषेकच्या रिप्लायचं होतंय कौतुक,म्हणाला...