Kangana Ranaut New Office in Mumbai : लोकसभा खासदार अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईत महागडी मालमत्ता खरेदी केल्याचं समोर येत आहे. कंगना रणौतनं मुंबईतील अंधेरी येथे उच्चभ्रू ठिकाणी जागा खरेदी केली आहे. कंगना या ठिकाणी आपलं नवीन ऑफिस सुरु करण्याच्या तयारीत आहे. कंगनाने या मालमत्तेसाठी 23 ऑगस्ट रोजी 9,37,500 रुपये स्टँम्प ड्युटी भरली आहे. कंगना रणौतने अंधेरी येथे सुमारे 1.56 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कंगनाने वांद्रे येथील बंगला विकल्याचंही सांगितलं जात आहे.
2026 मध्ये पूर्ण होईल कंगनाच्या ऑफिसचं काम
अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) अंधेरी पश्चिम (Andheri) येथे ऑफिससाठी (Office) 407 स्क्वेअर फूट जागा खरेदी केली आहे. नोंदणी दस्तऐवजानुसार, कंगना राणौतने खरेदी केलेली जागा आर्क वन ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये असेल. हे कॉम्प्लेक्स चंद्र गुप्ता इस्टेटने विकसित करत आहे, असा दावा प्रॉपस्टॅकने केला आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (MahaRERA) मध्ये त्याची नोंदणी ऑक्टोबर 2022 ची आहे. हा प्रोजेक्ट 2026 मध्ये पूर्ण होणार आहे.
कंगना रणौतने विकला पालिकेनं कारवाई केलेला बंगला
कंगना रणौतच्या वांद्रे येथील बंगल्यावर 2020 मध्ये मुंबई पालिकेने तोडक कारवाई केली होती. यामध्ये कंगनाच्या बंगल्याचा काही भाग तोडण्यात आला होता. यानंतर गेल्या काही दिवसांपासून कंगना हा बंगला विकणार असल्याची बातमी समोर येत होती. आता मिडिया रिपोर्टनुसार, कंगनाने वांद्रे येथील बंगला विकून अंधेरी येथे नवीन जागा खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. कंगनाने ही कोट्यवधींची डील केल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी कंगना ऑफिस सुरु करणार असल्याची माहिती आहे.
कंगनाच्या वांद्रेतील बंगल्यासाठी कोट्यवधींची डिल
गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौतने मुंबईतील वांद्रेमधीस तिचा 40 कोटींचा बंगला विकल्याच्या बातम्या येत आहेत. आता तिने अंधेरीमध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केल्याचे बातमी समोर आली आहे. ही मालमत्ता तिच्या नवीन ऑफिससाठी आहे. ही जागा सुमारे 1.56 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आहे. मात्र, कंगनाने या बाबतीत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, PropStack द्वारे ऍक्सेस केलेल्या मालमत्तेच्या नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, अभिनेत्री कंगना रणौतने 'आर्क वन' नावाच्या इमारतीच्या 19व्या मजल्यावर ऑफिसची जागा खरेदी केली आहे. या ऑफिसची जागा प्रति चौरस फूट 38,391 रुपये दराने विकत घेण्यात आली आहे. हा व्यवहार 23 ऑगस्ट रोजी झाला असून कंगनाने यासाठी 9.37 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :