Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli :  'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) यंदाच्या सीझनची जोरदार चर्चा सुरू आहे. या सीझनमधील स्पर्धकांनी आपल्या खेळाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.  घरातील टास्क, वादावादी, अनौपचारिक गप्पांकडे प्रेक्षकांचे लक्ष असते. या सीझनमध्ये घरातील स्पर्धक मॉडेल-अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हिची चांगलीच चर्चा रंगली आहे. बिग बॉसच्या घराबाहेरही निक्की चर्चेत आहे. पुण्यातील दहीहंडी उत्सवातही त्याची झलक दिसून आली.


बिग बॉस मराठीच्या  घरात झालेल्या वादांमध्ये निक्कीचे नाव असते. आक्रमकपणे, मोठ्या आवाजात मुद्दे मांडत इतर सदस्यांशी भांडण्यासोबत निक्की आपल्या खास डायलॉगसाठी प्रसिद्ध झाली आहे. निक्कीने गप्पा मारताना आपल्या खास शैलीत बाईSSS हा शब्द उच्चारला होता. त्याचे अनुकरण घरातील इतर सदस्यही करतात. सोशल मीडियावरही 'बाईSSS', 'बाईSSS हा काय प्रकार' हे निक्कीचे डॉयलॉग चांगलेच गाजत आहेत.


पुण्यात पार पडलेल्या दहीहंडी सेलिब्रेशनमध्ये डीजेच्या तालावर गोविंदाही थिरकले. यावेळी डीजेवर सुरू असलेल्या गाण्यात निक्कीचा जलवा दिसला. निक्कीच्या खास शैलीतील 'बाईSSS' हा शब्द गाण्यात मिक्सिंग करण्यात आले. गाण्याची झलक असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


 














 


बिग बॉस मराठीच्या घरातही निक्कीची छाप...


बिग बॉस मराठीचा यंदाचा नवा सीझन सुरू झाल्यावर निक्की तांबोळीचे घरातील इतर सदस्यांपासून पहिल्या दिवसापासून खटके उडण्यास सुरुवात झाली आहे. वर्षा उसगांवकर, आर्या जाधव, अंकिता वालावलकर यांच्यासोबत तिचा वाद गाजला. सध्या तीने आपल्या ग्रुप ए मधील इतर सदस्यांसोबत फारकत घेतली असल्याचे चित्र आहे. त्यामुळेही घरातील वातावरण तापले आहे. 


कोण आहे निक्की तांबोळी?


मराठमोळी निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. निक्की ही बिग बॉस मराठीच्या 14 व्या सिझनमध्येही दिसली होती. त्यानंतर ती अनेक सेलिब्रेटींच्या म्युझिक अल्बममध्येही झळकली होती. तसेच तिचा कांचना-3 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आता निक्की बिग बॉस मराठीचे घर गाजवत आहे.