Kangana Ranaut Reacts : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. देशात आणि जगात घडणाऱ्या घडामोडींवर नेहमीच ती तिची मतं व्यक्त करत असते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ झाले. त्यावर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. 


मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांनी पदाचा राजीनामा दिला असून  पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या (TWITTER)  सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंगनाचे ट्विटर अकाऊंट निलंबित झाल्यामुळे कंगना इंस्टाग्रामवर खूपच अॅक्टिव्ह असते. नुकतेच कंगनाने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्या स्क्रीनशॉटमध्ये पराग अग्रवाला आणि जॅक डोर्सीचा फोटो आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे,"बाय चाचा जॅक". 


जॅक डोर्सी राजीनामा देताना म्हणाले की, कंपनीत सह-संस्थापक ते सीइओ त्यानंतर अध्यक्ष ते कार्यकारी अध्यक्ष त्यानंतर अंतरिम-सीईओ ते पुन्हा सीईओ असा 16 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर, आता मला कंपनी सोडण्याची वेळ आली आहे. माझ्यानंतर पराग अग्रवाल कंपनीचा नवा सीईओ असेल.'




काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या घोषणेनंतर कंगना रनौतने शीख समुदयाला खलिस्तानी आंतकवादी म्हणत एक वादग्रस्त पोस्ट केली होती. कंगनाचं ट्विटर अकाउंट याआधीच हटवण्यात आलं असलं तरी तिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. ज्यानंतर तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली असून आता तिला थेट विधानसभेने समन्स बजावलं आहे. आमदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या नेतृत्वाखाली समितीने कंगनाच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता तिला हजर राहण्यास सांगतिले आहे. 


कंगनाचे आगामी सिनेमे
'इमर्जन्सी', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिड्डा', 'तेजस', 'धाकड' आणि 'सीता: द इन्कारनेशन' हे कंगना रणौतचे आगामी सिनेमे आहेत. 


संबंधित बातम्या


Parag Agrawal Twitter CEO : पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ


Omicron : ओमिक्रॉन व्हेरियंटचा विकी-कतरिनाच्या लग्नाला फटका, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय


तारीख पे तारीख! Ranbir- Alia च्या लग्नाला मुहूर्त सापडेना, लग्न वर्षभराने पुढं ढकलले


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha