Godavari Movie : गोव्यात 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोदावरी सिनेमाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. गोदावरी सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेता 'जितेंद्र जोशीला' सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'इफ्फी' हा भारतातील नव्हे तर जागतिक दर्जाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मानला जातो. 


'गोदावरी' सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 'रजत मयूर पुरस्कार' विभागून देण्यात आला आहे. मासाकाझू कानेको यांनी दिग्दर्शित केलेल्या 'रिंग वॉन्डिरग' या सिनेमाला मानाचा 'सुवर्ण मयूर' पुरस्कार देण्यात आला आहे. निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' हा सिनेमा आणि रॉड्रिगो डी ऑलिव्हेरा दिग्दर्शित 'द फस्र्ट फॉलन' चित्रपटातील भूमिकेसाठी ब्राझिलियन अभिनेत्री रेनाटा काव्‍‌र्हालोला विशेष परिक्षकांचा 'रजत मयूर पुरस्कार' विभागून देण्यात आला आहे. 


सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 'रजत मयूर' पुरस्कार अभिनेते जितेंद्र जोशीला, तर स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना यांना 'शार्लोट'मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी 'रजत मयूर' पुरस्कार देण्यात आला.  गीतकार प्रसून जोशी यांना 'भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व – 2021' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


गोदावरी सिनेमा येत्या 3 डिसेंबरला सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. गोदावरी सिनेमाचे आंतरराष्ट्रीय समीक्षणदेखील करण्यात आले होते. सिनेमा भारतात प्रदर्शित होण्याआधीच सिनेमाने सातासमुद्रापार मजल मारली आहे. आमच्या कुटूंबाची गोष्ट पहा तुमच्या कुटुंबियांसोबत, असे म्हणत सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. 


संबंधित बातम्या


Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत प्रशांत दामले


Bigg Boss 15 : अखेर बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री


Salman Khan visits Sabarmati Ashram : 'अंतिम' सिनेमाच्या प्रमोशनसाठी भाईजान थेट बापूंच्या आश्रमात, चरखा चालवत म्हणाला...


Atrangi Re Song Chaka Chak Out : Sara Ali Khan च्या 'अतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha