Radhe Shyam Song Teaser : साऊथचा सुपरस्टार अभिनेता प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा आगामी चित्रपट 'राधे श्याम' (Radhe shyam) हा 2022 च्या मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. जसजशी या चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख (Radhe Shaym Release Date) जवळ येत आहे, तशी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे. आता नुकताच या चित्रपटाच्या गाण्याचा टीझर (Teaser) प्रदर्शित (Release) झाला आहे.


टीझरमध्ये पूजा हेगडे आणि प्रभासची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या या नवीन गाण्याचा टीझर पाहण्यासाठी चाहते चांगलेच आकर्षित होतं आहेत. हे गाणे 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'राधे श्याम'च्या टीमनं नुकताच 'आशिकी आ गई' (Aashiqui Aa Gayi) गाण्याचा टीझर शेअर केला आहे. गाण्याच्या टीझरमध्ये पूजा हेगडे आणि प्रभास मॅचिंग ब्लू आउटफिट्समध्ये बीचवर फिरताना दिसत आहेत.



गाण्यातील हे दृश्य बघून एखाद्या ड्रीम सिक्वेन्सचा भास होतो. मोठ्या पडद्यावर रोमँटिक गाण्यामध्ये पूजा आणि प्रभासची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हे हिंदी गाणे विशेषतः हिंदी संगीत रसिकांना खूप आवडणार आहे. गाण्याच्या रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच पूजा हेगडे आणि प्रभासची जोडी 'राधे श्याम'मध्ये झळकणार आहे.राधा कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात प्रभास हाताच्या रेखांवरून भविष्य सांगणाऱ्या (Palm Reader) ज्योतिषीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभास आणि पूजा हेगडे यांचा 'राधे श्याम' हा चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.



हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha