Ranbir Alia Wedding : विकी कौशल आणि कतरिना कैफनंतर बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची चर्चा होत आहे. रणबीर कपूरने आलिया भट्टसोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा केल्यापासून त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षाच्या अखेरीस ते लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे लग्न एका वर्षाने पुढे ढकलले आहे. 


रणबीर कपूर आणि आलिया भट्टने लग्न करण्याचा त्यांचा प्लॅन जवळपास वर्षभराने पुढे ढकलला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या लग्नाला विलंब होणार नसून शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे लग्नाला विलंब होणार आहे. दोघांनी भारताबाहेर डेस्टिनेशन वेडिंगची योजना आखली आहे. पुढच्या वर्षाच्या शेवटी किंवा 2023 च्या सुरुवातीला लग्नसोहळा पार पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. नव्या घराच्या सजावटीत आलिया आणि रणबीर मेहनत घेतानादेखील दिसून आले होते. या नव्या घराच्या सजावटीत आलियाची आई नीतू कपूरदेखील त्यांना मदत करत आहेत. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.






रणबीरचा आगामी सिनेमा
रणबीरचा आगामी 'अॅनिमल' सिनेमा 11 ऑगस्ट 2023 ला जगभरात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीरसह अनिल कपूर, बॉबी देओल आणि परिणीती चोप्रादेखील दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रणबीर आणि वांगा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 


संबंधित बातम्या


Salman Khan visits Sabarmati Ashram : 'अंतिम' सिनेमाच्या प्रमोशनसाठी भाईजान थेट बाबूंच्या आश्रमात, चरखा चालवत म्हणाला...


Atrangi Re Song Chaka Chak Out : Sara Ali Khan च्या 'अतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


दोन महिन्यात 12 शो रद्द! कॉमेडियन मुनव्वर फारुकी म्हणाला, कलाकार हरला, अलविदा...!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha