मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना खुल्लं आव्हान देणारी कंगना रनौत आता पळ काढताना दिसत आहे? कंगना रनौतला आज तिसऱ्यांदा मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. मात्र, आजही कंगना हजर राहिली नाही. उलट कंगनाकडून वांद्रे पोलीस स्टेशन येथे दाखल असलेली एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे जर कंगना काही चुकीचं बोलली नाही तर ती का लपत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Continues below advertisement


न्यायपालिकेवर विश्वास असण्याची मोठ मोठ्या बाता करणारी कंगना आता त्याच न्याय पालिकेचा कुठेतरी अपमान करताना दिसत आहे. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कंगना आणि तिची बहीण रंगोली विरोधात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, हा गुन्हा कोर्टाच्या आदेशानंतर दाखल करण्यात आला आहे. याच्या चौकशीसाठी पोलिसांनी कंगनाला तीन वेळा समन्स बजावले. मात्र, तिन्ही वेळा कंगनाने हे आदेश धुडकावून लावले. आजही एफआयआर रद्द करण्यासाठी कंगनाने कोर्टात धाव घेतली.


भाचा कृष्णा अभिषेकसोबतच्या मतभेदांवर गोविंदा यांनी सोडलं मौन; म्हणाले...


मुंबई पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे, की कंगनाला आता पुन्हा समन्स बजावण्यात येणार नाही. पोलीस आता कंगना विरुद्धच्या तपासाचा वेग वाढवणार आहेत. पोलिसांनी कंगना विरुद्ध पुरावे गोळा करण्याचं काम सुरु केलं आहे. पोलिसांनी ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकला पत्र लिहून कंगनाच्या अकाउंटची आणि IP Address ची पूर्ण माहीती मागितली आहे. याच्या माध्यमातून पोलीस हे सिद्ध करतील की सर्व पोस्ट कंगनाच्या अधिकृत अकाउंटमधून केल्या गेल्या आहेत का? आणि त्याला आधार करत पोलीस कंगनाला अटक करुन चार्जशीट दाखल करण्याच्या तयारीत आहेत.


26 ऑक्टोबरला पोलिसांनी जेव्हा पहिला समन्स बजावला तेव्हा कंगनाने भावाच्या लग्नाचं कारण देत उपस्थित राहण्यास नकार दिला. 10 नोव्हेंबरला दुसरा समन्स दिल्यानंतर त्याला कंगनाकडून उत्तर आलं नाही तर 23 नोव्हेंबरला समन्स बजावलं मात्र आज सुद्धा कंगना आली नाही आणि आज तिने कोर्टाचा दार ठोठावलं.


बॉयकॉट नेटफ्लिक्स हॅशटॅग ट्रेंडिंग, अ सुटेबल बॉय सीरीजमधल्या 'त्या' सीनमुळे ट्विटरवर वाद


सरकारी वकील अॅड. प्रकाश साळशिंगेकर यांच म्हणणं आहे, की ‘कंगनाच्या बाबतीत पोलीस समन्सनंतरही ती चौकशीला हजर न झाल्यानं तिच्याविरोधात वॉरंटसाठी कोर्टात जाऊ शकतात. त्यात दंडाधिकारी कोर्ट थेट वॉरंटही जारी करू शकतात, अथवा कंगनाला वॉरंटबाबत भूमिका मांडण्याची संधी देऊ शकतात. दरम्यान कंगना गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात येऊ शकते, जर ती आली असेल तर त्यावरील सुनावणी महत्त्वपूर्ण आहे. कारण या परिस्थितीत तिला हायकोर्टचं एखादा दिलासा देऊ शकेल.’


कंगनाच्या वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याचा आरोप कंगनावर आहे. आपल्या विरुद्ध दाखल झालेली एफआयआर रद्द करण्यासाठी कंगनाने न्यायपालिकेचे दार ठोठावलं. मात्र, त्याच न्यायपालिकेने कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे कंगनाने पोलिसांच्या चौकशीत सहकार्य करावं हे तीच कर्तव्य होतं. मात्र, दुसऱ्यांना कर्तव्याची जाण करून देणारी कंगना तिचचं कर्तव्य विसरल्याचं दिसत आहे.


आता मला कळलं भारती-हर्ष लग्नात इतकी कॉमेडी कशी करत होते; राजू श्रीवास्तव भडकला!


ज्या मुंबई पोलिसांवर कंगनाने टीका केली. जेव्हा वादग्रस्त वक्तव्य करून मुंबईत आली, तेव्हा याच मुंबई पोलिसांनी कंगनाच्या सुरक्षेसाठी जागता पहारा देऊन तिची सुरक्षा केली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या चौकशीला कंगना हजर राहू शकत होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंगना हैदराबादमध्ये तिच्या पिक्चरची शूटिंग करत आहे. तिच्या ऑफिस वर हतोडा पडताच मुंबईच्या दिशेने धाव घेणारी कंगना आता चौकशीपासून पळ काढत आहे.