ट्विटरवर सध्या बॉयकॉट ट्विटर हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे. याला कारण, नेटफ्लिक्सवरची सीरीज कारणीभूत ठरली आहे. सध्या नेटफ्लिक्सवर अ सुटेबल बॉय ही सीरीज आली आहे. खरंतर तीन महिन्यांपूर्वीच ही सीरीज इंग्रजीमध्ये आली होती. त्यावेळी यापैकी काही वाद झाला नाही. पण आता ही सीरीज हिंदी भाषेत आल्यानंतर मात्र या वेब सीरीजवरून वाद निर्माण झाले आहेत.
मी कपडे बदलताना त्यांनी दरवाजा उघडला, मंदना करीमीचा निर्माते धारिवाल यांच्यावर आरोप
अ सुटेबल बॉय या मालिकेत एक मुस्लीम मुलगा एका हिंदू मुलीचं चुंबन घेतानाचं दृश्य आहे. हा सगळा सीन एका मंदिराच्या आवाराता घडतो. त्यामुळे ट्विटरवर काहींच्या भावना दुखावल्या आहेत. क्रिएटीव्ह फ्रिडम याला म्हणतात असं सांगत अनेकांनी बॉयकॉट नेटफ्लिक्सचा नारा दिला आहे. यातल्या एकाने तर या सीनबद्दल थेट केस करण्याचीच भाषा सुरू केली आहे. हा हॅशटॅग ट्रेंड करताना यावरचे काही मीम्सही तयार झाले आहेत. या वेबसीरीजमधला दाखवण्यात आलेला सीन हा आपल्या संस्कृतीचा भाग नाहीय अस अनेकांचं म्हणणं आहे. यात मुस्लीम मुलगा हिंदू मुलीचं चुंबन घेतो याला अनेकांचा आक्षेप नाहीय. तर हा सीन चित्रित होणारी जागा ही हिंदू मंदिर आहे. अशा ठिकाणी अशा गोष्टी करण्याची आपली संस्कृती नाही असं यांचं म्हणणं.
आता मला कळलं भारती-हर्ष लग्नात इतकी कॉमेडी कशी करत होते; राजू श्रीवास्तव भडकला!
बॉयकॉट नेटफ्लिक्सच्या या हॅशटॅगमुळे पुन्हा एकदा वेबसीरीज आणि त्यात दाखवला जाणारा कंटेंट यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. ऑनलाईन विश्वात येणाऱ्या बेवसीरीजवर पुन्हा एकदा अंकुश असावा का. त्यावर सेन्सॉरशिप असावी का हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर येऊ लागले आहेत. वेबसीरीज बनवताना निर्मात्यांनीही लोकांच्या मानसिकतेचा, श्रद्धेचा विचार करायला हवा असं सांगितलं आहे. आता हा हॅशटॅग पुढे कुठे जातो ते कळण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.