Kangana Ranaut on Karan Johar : करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवसात  चित्रपटाने 50 कोटींचा आकडा पार केला आहे. त्याचवेळी आपल्या परखड मतांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत हिने रणवीर-आलियाच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या यशावरून करण जोहरवर निशाणा साधला आहे. करण जोहरला "पेड पीआर" द्वारे त्याने केलेल्या त्याच्या चित्रपटांना चांगले रिव्हूज मिळतात असा दावा या अभिनेत्रीने तिच्या इंस्टा वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.


कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत करण जोहरला एका विद्यार्थ्यानं पीआरवर प्रश्न विचाराला. त्यावर उत्तर देत करण बोलतो की 'आकडे बदलता येतात. पैसे देऊन काहीही बदलता येतं. करणचा हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने कॅप्शन दिलं की करण जोहर म्हणत आहे की, मी लोकांच्या मनात काहीही घालू शकतो. हिटला फ्लॉप आणि फ्लॉपला हिट बनवू शकतो. दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवस बनवू शकतो. फक्त पैसे द्यायचे. करण जोहर फक्त स्वत:च्याच चित्रपटाला हिट करतो. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर करणचा जुना व्हिडिओही शेअर केला आणि लिहिले की, "पेड पीआरचा गौरव... मी काहीही लिहिण्यासाठी पैसे खर्च करू शकतो. एवढा अभिमान तर रावणालाही नव्हता. "


यापूर्वी देखील कंगनाने "पठाण" चित्रपटावर सडकून टिका केली होती. ‘फिल्म इंडस्ट्री इतकी मूर्ख आहे की जेव्हा जेव्हा त्यांना एखाद्या कलेचं, निर्मितीचं किंवा प्रयत्नांचं यश दाखवायचं असतं तेव्हा ते तुमच्या चेहऱ्यावर पैशांचे आकडे फेकतात. जणू कलेचा दुसरा कोणता हेतूच नसतो. यातून त्यांचं खालच्या दर्जाचं जीवन आणि ज्याप्रकारचं वंचित आयुष्य ते जगतात ते उघड होतं,’ असं तिने म्हणले होते. 


दरम्यान, 28 जुलै रोजी करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटानं पहिल्या तीन दिवसात 45 कोटींचा आकडा पार केला आहे. तर दुसरीकडे कंगनाचा ‘इमरजेंसी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या