Kangana Ranaut: चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) रॉकी और रानी की प्रेम कहानी  (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) नुकतीच एक पोस्ट शेअर करुन करणवर निशाणा साधला आहे. करण हा डेली सोपसारखे चित्रपट बनवतो, त्यानं आता रिटायर  व्हावं, असं कंगनानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.


कंगनाची पोस्ट


कंगनानं पोस्टमध्ये लिहिलं, “भारतीय प्रेक्षक न्युक्लिअर वेपन आणि अणुविज्ञानावर आधारित असणारा 3 तासांचा चित्रपट पाहत आहेत. आणि ही नेपो गँग त्यांचा 'सास बहू का रोना' दाखवत आहेत, एक डेली सोप बनवण्यासाठी  250 कोटी का लागतात? सारखे तसेच चित्रपट बनवणाऱ्या  करण जोहरला लाज वाटली पाहिजे. हा स्वत:ला भारतीय चित्रपटसृष्टीचा ध्वजवाहक म्हणवून घेतो आणि सतत मागे पडत राहतो. एवढे पैसे वाया घालवू नको, आता तू रिटायर हो आणि तरुण चित्रपट निर्मात्यांना नवीन आणि क्रांतिकारी चित्रपट बनवू देत.'




रणवीर सिंहला दिला हा सल्ला



कंगनानं पुढे पोस्टमध्ये रणवीर सिंहला एक सल्ला दिला आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, “रणवीर सिंहला माझा प्रामाणिक सल्ला आहे की, त्याने करण जोहर आणि त्याच्या ड्रेसिंग सेन्सवरुन प्रभावित होऊ नये. रणवीरनं धर्मेंद्रजी किंवा विनोद खन्ना जी यांनी त्यांच्या काळात घातलेल्या ड्रेस प्रमाणे सामान्य माणसासारखे कपडे घालावेत."




करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रंधावा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच सोशल मीडियावर अनेक जण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. 


कंगनाचे आगामी चित्रपट 


कंगना ही सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करत असते.  कंगनाच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.  कंगना (Kangana Ranaut) ही चंद्रमुखी 2 या चित्रपटाबरोबरच इमर्जन्सी आणि तेजस  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.    कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. 


संबंधित बातम्या


Rocky Aur Rani Ki Prem Kahani : आलिया-रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' फ्लॉप की सुपरहिट? जाणून घ्या ओपनिंग डे कलेक्शन...