Krrish 4 : हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) सिनेमाचे शूटिंग करत आहे. दरम्यान हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी क्रिशच्या पुढील सिक्वेलची तयारी सुरू केली आहे. सिनेमाच्या शूटिंगला पुढील वर्षात सुरुवात होणार आहे. 


'क्रिश 4' सिनेमात हृतिक शिवाय कोणते कलाकार असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हृतिकचे सध्या अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. हृतिक 'विक्रम वेधा'च्या शूटिंगनंतर 'फायटर' सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.





 


'फायटर' सिनेमाचे शूटिंग 100 दिवसांचे आहे. हे शूटिंग या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. 28 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. 


कोई मिल गया (2003), क्रिश (2006) आणि क्रिश 3 (2013) या मालिकेतला 'क्रिश 4' हा चौथा भाग असेल. हृतिक रोशनने तिन्ही सिनेमांत मुख्य भूमिका साकारली आहे. आता 'क्रिश 4' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 


संबंधित बातम्या


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त


Movies On Tv : सिनेमागृहानंतर छोट्या पडद्यावरदेखील 'हे' सिनेमे आमने-सामने


Sonu Sood : मी आणि मालविका दोघेही आयुष्यभर तुमच्या सेवेत तत्पर राहू, पराभवानंतर सोनू सूदने केलं ट्वीट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha