Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद (Malvika Sood) यांचा मोगा मतदारसंघातून पराभव झाला आहे. आपच्या डॉक्टर अमनदीप कौर आरोरा यांनी मालविका सूद यांचा पराभव केला. मालविका आणि अमनदीप कौर आरोरा यांच्यात जबरदस्त लढत पाहायला मिळाली होती. दरम्यान बहिणीच्या पराभवानंतर अभिनेता सोनू सूदने पहिले ट्वीट केले आहे. 


सोनू सूद सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. तो ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट्स देत असतो. आता त्याने बहीण मालविका सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनदेखील लिहिले आहे.





सोनेने लिहिले आहे,"विरोधात किती आहेत, हे आवश्यक नाही, सोबत किती आहेत, हे महत्वाचं आहे. मदत करण्यासाठी, फक्त जिद्द आणि उत्साह गरजेचा आहे. मी आणि मालविका दोघेही आयुष्यभर तुमची सेवा करत राहू". सोनूचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे".


कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद ‘मसीहा’ बनून लोकांच्या मदतीला धावून आला. अन्न धान्य असो वा वैद्यकीय मदत, राहण्याचा आसरा असो वा घरी जाण्यासाठीची मदत सोनू सूदने लोकांना शक्य ती सगळी मदत पुरवली. त्याच्या याच इमेजचा मालविका फायदा होईल असे वाटत होते. 


संबंधित बातम्या


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त


Movies On Tv : सिनेमागृहानंतर छोट्या पडद्यावरदेखील 'हे' सिनेमे आमने-सामने


Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' आता ओटीटीवर पाहता येणार; पाहा कोणत्या अॅपवर, कधी रिलीज होणार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha