Kangana Ranaut : अनेक दिवसांपासून एकामागून एक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या कंगना रनौतने (Kangna Ranaut) आता हुकुमाचा एक्का बाहेर काढला आहे. कंगनाला मागील काही चित्रपटांपासून बॉक्स ऑफिसवर अपयश पाहावे लागत आहे. आपल्या चित्रपटाकडे पाठ फिरवणाऱ्या प्रेक्षकांना पुन्हा तिकीटबारीकडे वळवण्यासाठी कंगनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कंगनाने आता आर. माधवन (R. Madhavan) सोबत चित्रपट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'या सुपरहिट चित्रपटातील जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
माधवनसोबत काम करणार असल्याची माहिती कंगना रनौतने सोशल मीडियावर युजर्ससोबत शेअर केली आहे. कंगना रनौतने इंस्टाग्राम स्टोरीवर आर माधवनसोबतचा तिचा सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीसोबत तिने कॅप्शनही लिहिले आहे. माझ्या आवडत्या आर माधवनसोबत आणखी एका उत्तम स्क्रिप्टसह परत येत आहे, असे कंगनाने म्हटले.
याशिवाय तिने आणखी एक फोटो शेअर केला असून त्यात ती काही लोकांसोबत बसलेली दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने किती छान टीम आहे, असे म्हटले.
माधवन यांचे करिअर खराब करणार का? नेटकऱ्यांचा सवाल
कंगनाच्या या स्टोरीवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. कंगना रनौत आता माधवनचे करियर खराब करेल, माधवन जी कंगनापासून अंतर ठेवा, अन्यथा ती तुमचेही करिअर खराब करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही असेही एका युजरने म्हटले. तर, एका यूजरनेचला, कोणीतरी तिची आवडती आहे, नाहीतर ती सर्वांच्या विरोधात आहे असे म्हटले.
याआधीदेखील माधवनसोबत कंगनाने केलंय काम
कंगनाने याआधी आर. माधवनसोबत 'तनू वेड्स मनू' आणि त्यानंतर त्याचा सिक्वेल 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'मध्ये एकत्र काम केले आहे. 'धाकड' आणि 'तेजस' हे शेवटचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. त्याआधी 'मणिकर्णिका'याने सरासरी व्यवसाय केला. त्यानंतरचे 'पंगा' आणि 'थलाईवी' सारखे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.
आगामी 'एमर्जन्सी' चित्रपटाची चर्चा
सध्या कंगना तिच्या आगामी 'एमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटात कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत श्रेयस तळपदे, अनुपम खेर, महिमा चौधरी आणि पुपुल जयकर हे देखील दिसणार आहेत. विशेष म्हणजे कंगना या चित्रपटात अभिनयासोबतच दिग्दर्शनही करत आहे.