Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) कधी आपल्या चित्रपटांमुळे किंवा कधी  आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना पुन्हा एकदा चर्चेत  आली आहे. शनिवारी, मुंबईत एका चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी तिला तू कधी पंतप्रधान होण्याचा विचार केला आहेस का, असा प्रश्न विचारला. त्यावेळी कंगनाने उत्तर देताना आपल्या 'एर्मजन्सी'मध्ये साकारलेल्या पंतप्रधानपदाच्या व्यक्तीरेखेचेही थट्टा उडवली. 


मुंबईत शनिवारी, 'रझाकार: द सायलेंट जेनोसाईड ऑफ हैदराबाद' या तेलगू चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. त्यावेळी कंगनाला तू पंतप्रधान होण्याचा विचार केला आहेस का असा प्रश्न केला. कंगना रणौतने म्हटले की, मी आताच 'एर्मजन्सी' नावाचा चित्रपट केला. हा चित्रपट केल्यानंतर मला कोणीही पंतप्रधानपदी पाहण्याचा विचार करणार नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती कंगनाने केली आहे. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. एमर्जन्सी चित्रपटाची कथा ही आणीबाणी आणि इंदिरा गांधी यांच्याभोवती  आहे. 


कंगना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?


फेब्रुवारी, 2023 मध्ये कंगनाने म्हटले होते की मी कोणतीही राजकीय नेता अथवा व्यक्ती नाही. ट्वीटरवर तिने म्हटले की, मी एक संवेदनशील आणि समजूतदार व्यक्ती आहे. कोणतीही राजकीय व्यक्ती नाही. राजकारणात येण्याासाठी अनेकांनी आग्रह केला. मात्र, मी कधीही राजकारणात उतरण्याबाबत निर्णय घेतला नाही. मात्र, नोव्हेंबर महिन्यातच कंगनाने लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी पत्रकारांनी निवडणुकीबाबत विचारले असता,  श्रीकृष्णाची कृपा राहिल्यास निवडणूक लढवू असे तिने म्हटले. 


 'एर्मजन्सी' कधी होणार रिलीज?


'एर्मजन्सी' चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमन, श्रेयश तळपदे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक यांची भूमिका आहे. 'एर्मजन्सी' हा चित्रपट 14 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.  हा चित्रपट आधी  24 नोव्हेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता.  मात्र, 'सलार' आणि 'टायगर 3' रिलीज झाले होते. त्याशिवाय इतर काही कारणाने चित्रपटाची रिलीज पुढे ढकलण्यात आले. 






 


इतर संबंधित बातम्या :