एक्स्प्लोर
करणीसेनेला सॉरी-बिरी बोलणार नाही, कंगना भूमिकेवर ठाम
'मी माफी मागणार नाही. मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी माफी मागत नाही. इथे तर माझी काहीच चूक नाही. आम्ही त्यांना (करणीसेना) चित्रपटात काहीच आक्षेपार्ह नसल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य करणं अपेक्षित आहे.' असं कंगनाने स्पष्ट केलं.
मुंबई : करणीसेनेची माफी न मागण्याच्या भूमिकेवर अभिनेत्री कंगना रनौत ठाम आहे. 'फुकटचा इगो इश्यू माझ्यासमोर दाखवण्याची गरज नाही. मी इथे कोणालाही सॉरी-बिरी बोलणार नाहीये' असं कंगनाने ठणकावून सांगितलं. करणीसेनेने खारमधील कंगनाच्या घराबाहेर आंदोलन केलं.
बहुचर्चित 'मणिकर्णिका' चित्रपटात कंगना मुख्य भूमिका साकारत असून या सिनेमाला करणीसेनेचा विरोध आहे. याबाबत कंगनाने आडवे याल तर शिंगावर घेण्याची भूमिका घेतली होती. मी पण राजपूत आहे, करणीसेनेने त्रास देणं थांबवलं नाही, तर त्यांना उद्ध्वस्त करेन, असा इशारा कंगनाने दिला होता. त्यानंतर कंगनाने आपली माफी मागावी, अशी मागणी करणीसेनेने केली होती.
...तर करणी सेनेला उद्ध्वस्त करेन : कंगना रनौत
'मी माफी मागणार नाही. मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी माफी मागत नाही. इथे तर माझी काहीच चूक नाही. आम्ही त्यांना (करणीसेना) चित्रपटात काहीच आक्षेपार्ह नसल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य करणं अपेक्षित आहे. मणिकर्णिका आपली राष्ट्रकन्या असल्यामुळे करणीसेनेने पाठिंबा द्यायला हवा. सर्वांनी मिळून सिनेमाला प्रमोट करायला हवं' असं मत कंगनाने एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं.'ठाकरे'साठी 'मणिकर्णिका'ची तारीख बदलण्यास कंगनाचा नकार
'मणिकर्णिका काही माझ्या नातेवाईक किंवा पूर्वज नव्हत्या. संपूर्ण देशाचं त्यांच्याशी जे नातं आहे, तेच माझंही आहे. मणिकर्णिका भारताची कन्या आहे. करणीसेनेने सहकार्य करायला हवं' असंही कंगना म्हणते. मणिकर्णिका हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा चार इतिहासकारांनी प्रमाणित केल्याची माहिती कंगनाने दिली होती. सेन्सॉर बोर्डाकडूनही या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी या सिनेमात गाणं लिहलं आहे. या सिनेमातून देशप्रेम व्यक्त करा असा संदेश देण्यात आला आहे, असं प्रसून जोशींनी सांगितल्याचं कंगना म्हणाली होती. या सिनेमात राणी लक्ष्मीबाई यांचे एका ब्रिटीश अधिकाऱ्यासोबत संबंध दाखवण्यात आल्याच्या काही बातम्या आल्यानंतर करणी सेनेनं या सिनेमाला विरोध सुरु केला आहे. रिलीज करण्यापूर्वी चित्रपट करणी सेनेला दाखवण्यात यावा, अन्यथा हा सिनेमा चित्रपटगृहात चालू देणार नाही अशी भूमिका करणी सेनेनं घेतली होती. कंगनाने मणिकर्णिका सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे. या सिनेमात कंगनासह अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, डॅनी डेंगझोप्पा, सुरेश ओबेरॉय, वैभव तत्त्ववादी यांसारखे कलाकार दिसणार आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement