एक्स्प्लोर
Advertisement
कंगनाने बॉलिवूड सोडण्याचा विचार करावा : करण जोहर
मुंबई : बॉलिवूडमधील कंपूशाही या न् त्या प्रकारे समोर येत असते. दोन सेलिब्रेटींमधील शीतयुद्ध ऐकायला मिळतात, तर काही वेळा हे वाद उघडपणे पाहायला मिळतात. नुकतंच पितृत्व लाभलेला बॉलिवूडचा फिल्ममेकर करण जोहर आणि 'क्वीन' अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
हृतिक रोशन आणि कंगना यांच्यातील कायदेशीर लढाई ताजी असतानाच करणसोबतचं भांडणही उघड झालं आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये 'रंगून'च्या प्रमोशनसाठी हजेरी लावलेल्या कंगनानं अँकर करण जोहरच्या कार्यपद्धतीवरच सडकून टीका केली होती. 'करण केवळ स्टारपुत्रांनाच संधी देतो. मी एखादा चित्रपट तयार केला, तर करणला त्यात 'मूव्हीमाफिया'ची भूमिका देईन. ती व्यक्तिरेखा अतिशय घमेंडखोर असेल.' असे टीकेचे बाण कंगनानेच्या करणच्याच शोमध्ये सोडले होते.
कंगनाचा हा वार करणच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. स्वतःच्या शोमध्येच निरुत्तर झालेल्या करणने लंडनमध्ये दिलेल्या मुलाखतीत मात्र कंगनावर ताशेरे ओढले आहेत. कंगनाला वशिलेबाजीचा अर्थच कळलेला नाही. तिला बाईपणाचा बाऊ करताना किंवा अन्यायाला बळी पडल्याचं भांडवल करताना पाहून मी कंटाळलो आहे. तिला इतकाच त्रास होत असेल, तर तिने बॉलिवूड सोडण्याचा विचार करावा, असा टोला हाणला.
कंगनाने करणच्या प्रतिक्रियेवरही पलटवार केला आहे. करणला वशिलेबाजीचा अर्थ काय वाटतो, हे मी सांगू शकत नाही. त्याच्या मते मुली, भावंड, भाचे-पुतणे इतकीच या शब्दाची व्याप्ती असेल, तर ठीक आहे. पण मला काम न देण्याचा त्याचा निर्णय ही कलाकार म्हणून थट्टा आहे. त्याची स्मरणशक्तीही काहीशी कमजोर दिसते. आम्ही 'उंगली' चित्रपटात एकत्र काम केलं, मात्र आमचे सूर न जुळल्याने पुढे सिनेमे केले नाहीत, असा दावा कंगनाने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement