Kalki 2898 AD Box Office Collection Day 2 In Hindi Version : प्रभास, दीपिका पदुकोण दिग्दर्शित आणि नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडले आणि दमदार कलेक्शन केले. विशेष म्हणजे हिंदी भाषेतही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि चांगली कमाई होत आहे. 


'कल्की 2898 एडी'ने किती केली कमाई?


'कल्की 2898 एडी'ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. ट्रेलर रिलीजनंतर चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली होती. साय-फाय चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चांगली गर्दी होत आहे. रिलीज दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी कमाई काहीशी कमी झाली.  


'कल्की 2898 एडी' हा चित्रपट सहा भाषेत रिलीज झाला आहे. हिंदीत डब झालेल्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'कल्की 2898 एडी'ने पहिल्या दिवशी सहा भाषांमधील बॉक्स ऑफिसवर 95 कोटींची कमाई केली होती. त्यात हिंदीत चित्रपटाचा वाटा 22.5 कोटींचा होता.


रिलीजच्या दुसऱ्या दिवशीचा अर्थात शुक्रवारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे प्राथमिक आकडे समोर आले आहेत. 'कल्की 2898 एडी'चे रिलीज झालेल्या सहा भाषांमधील एकूण कलेक्शन हे 54 कोटी इतके झाले. त्यात हिंदीचा वाटा 22.5 कोटींचा राहिला.


यासह, सर्व भाषांमध्ये 'कल्की 2898 एडी'चे एकूण कलेक्शन 149.3 कोटी रुपये होते, तर केवळ हिंदीमध्ये चित्रपटाची दोन दिवसांची एकूण कमाई 45 कोटी रुपये होती.


'कल्की 2898 एडी' वीकेंडला हिंदीतच 100 कोटींची कमाई करणार?


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना शनिवारी आहे. यामुळे 'कल्की 2898 AD' च्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. परंतु रविवारी हा चित्रपट पुन्हा चांगली कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 'कल्की 2898 एडी' च्या चार दिवसांच्या वीकेंडला उत्तर भारतात 95 कोटी रुपयांची कमाई होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे फक्त हिंदीत हा चित्रपट वीकेंडला 100 कोटींची कमाई करू शकतो. 


 'कल्की 2898' चित्रपटाची कथा काय?


'कल्की 2898' ची कथा 29व्या शतकातील काशीवर आधारित आहे. हे शहर जगातील अखेरचे शहर असल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात, प्रभासने भैरव नावाची व्यक्तीरेखा साकारली आहे. गरोदर असलेल्या 'सुम -80'ला (दीपिका) पकडण्यासाठी  भैरवला पैसे देण्यात आले आहेत. तिच्या पोटी भगवान विष्णू यांचा अवतार कल्की जन्म घेणार आहे. तर, अश्वात्थामा (अमिताभ बच्चन) तिचे संरक्षण करत आहेत.


इतर संबंधित बातमी :