मुंबई : बॉलिवूडच्या सुंदर हॉट ॲन्ड बोल्ड अभिनेत्रीपैकी एक वाणी कपूर (Vaani Kapoor) आगामी 'बदतमीज गिल' (Badtameez Gill) या चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर वेगळ्या शैलीत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'बदतमीज गिल' चित्रपटात वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून ती पहिल्यांदाच या चित्रपटात कॉमेडी करताना दिसणार आहे. या चित्रपटाबाबत बोलताना वाणी कपूरने सांगितलं की, मी 'बदतमीज गिल' चित्रपटामध्ये कॉमेडी करताना दिसणार आहे. मी या आधी कॉमेडी चित्रपट केलेला नाही, असं तिने म्हटलं आहे.


'बदतमीज गिल'मध्ये नव्या शैलीत दिसणार वाणी कपूर


'बदतमीज गिल' चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाणी कपूर  आता दुसऱ्या शेड्यूलसाठी ब्रिटनला जाणार आहे. वाणी याबाबत सांगताना म्हटलं आहे की, 'आमचं पुढील शेडूल यूकेमध्ये आहे आणि मी हा रोमांचक अनुभव घेण्यासाठी सज्ज आहे. बदतमीज गिल चित्रपटात मी एका नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे, ज्याचा मला खूप आनंद आहे. हा चिपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. निर्मात्यांना माझ्या अभिनय क्षमतेवर विश्वास आहे आणि मुख्य भूमिकेसाठी माझी निवड केल्याने मी खूप आनंदी आहे. मी माझ्या परीने सर्वोत्कृष्ट काम करण्याचा आणि एक कलाकार म्हणून माझी विविधता दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे.'


हॉट ॲन्ड बोल्ड अवतारात कॉमेडीचा तडका


वाणी 'बदतमीज गिल' चित्रपटासोबत कॉमेडी शैली एक्सप्लोर करत आहे. मी एक अशा शैली एक्सप्लोर करत आहे, ज्यामध्ये मला अजून खोलवर जाण्याची संधी मिळाली नव्हती, एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी हे मजेदार आणि आव्हानात्मक आहे. मला कॉमेडी आवडते, कौटुंबिक कॉमेडी चित्रपटांचा प्रत्येकजण एकत्र बसून आनंद घेऊ शकेल असा प्रकार. मी बदतमीज गिलच्या शूटिंगचा खूप आनंद घेत आहे.


बरेलीतील शूटिंग पूर्ण, पुढील शेड्युल युकेमध्ये


मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे शूटिंग बरेलीमधील शूटिंग पूर्ण झालं असून टीम लवकरच पुढील शेड्युलसाठी युकेला जाणार आहे. या चित्रपटात वाणी कपूरशिवाय अभिनेता अपारशक्ती खुराना आणि परेश रावल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अपारशक्ती खुराना मुलीच्या भावाच्या भूमिकेत तर परेश रावल वडिलांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे.


'बदतमीज गिल'चित्रपटाची निर्मिती निक्की भगनानी आणि विकी भगनानी करत आहेत. या चित्रपटाचे लेखन नवज्योत गुलाटी यांनी केलं आहे. नवज्योत गुलाटी यांनी याआधी 'रनिंग शादी', 'गिन्नी वेड्स सनी' या चित्रपटाच्या कथा लिहिल्या आहेत. गुलाटी यांनी 'जय मम्मी दी' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.