Jui Gadkari : जुई गडकरी (Jui Gadkari) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या सुपरहिट मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण ही मालिका करण्याआधी काही दिवस ती मनोरंजनसृष्टीपासून दूर होती. अभिनेत्री एका गंभीर आजाराने त्रस्त होती. 


जुई गडकरीने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली,"मी आई होऊ शकणार नाही हे डॉक्टरांनी मला वयाच्या 27 व्या वर्षी सांगितलं होतं. डॉक्टरांनी मला जेव्हा हे सांगितलं तेव्हा मी 'पुढचं पाऊल' ही मालिका करत होते. मालिकेत तेव्हा कल्याणीला बाळ होणार असल्याचा ट्रॅक सुरू होता. त्यावेळी एकीकडे खऱ्या आयुष्यात मला बाळ होणार नाही आणि दुसरीकडे मालिकेत मला एका आईची भूमिका साकारायची होती. ते दिवस माझ्यासाठी खूप त्रासदायक होते. 


जुई गडकरी म्हणाली,"मानसिकदृष्ट्या मी खचले होते. मणका डिजनरेट झाला होता. पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिन ट्युमर झाला होता. त्यामुळे मी आई होऊ शकत नाही, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. सुरुवातीला फक्त डोकं दुखायचं, पुढे वजन वाढलं. मासिक पाळीत अडचणी येऊ लागल्या".






भविष्यात मी जुळ्या मुलांची आई होऊ शकते : जुई गडकरी


जुई गडकरी पुढे म्हणाली,"आपल्या समाजात स्त्रीला मुलबाळ झाल्यावरच ती पूर्ण होते असा समज आहे. पण ज्या महिलांना बाळ होऊ शकत नाही त्यांनी काय करायचं? त्या स्त्रिया नाहीत का? तिच्यात मातृत्व नाही का? मला आज अनेक लोक म्हणतात वयाची 35 वर्षे पार केलीस आता कधी लग्न करणार? पण माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. महत्त्वाचं म्हणजे यासगळ्यात माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. त्यामुळे मला फरक पडत नाही. आता माझे रिपोर्ट सकारात्मक येत असून भविष्यात मी जुळ्या मुलांची आई होऊ शकते. 


जुई गडकरीने आता गंभीर आजारावर मात करत 'ठरलं तर मग' या मालिकेच्या माध्यमातून दमदार कमबॅक केलं आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत तिने साकारलेली सायलीची व्यक्तिरेखा चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.


'ठरलं तर मग' या मालिकेसह जुई गडकरीने बाजीराव मस्तानी, माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुझवीण सख्या रे, पुढचं पाऊल, वर्तुळ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.


संबंधित बातम्या


Tharala Tar Mag Latest Episode : अर्जुनला आणखी एक मोठा धक्का, सायलीच्या हातचं खाण्यास पूर्णा आजीचा नकार; 'ठरलं तर मग' मालिकेत आज काय पाहाल?