Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत अनेक रंजक ट्वीस्ट येत आहेत. सायली-अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेच्या आजच्या भागात अर्जुनला 


'ठरलं तर मग'च्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार? (Tharala Tar Mag Todays Episode)


'ठरलं तर मग' मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला प्रतापच्या ऑफिसमध्ये अर्जुन जातो आणि कोर्टाच्या फाईलवर त्याची सही मागताना दिसतो. त्यावेळी माझा वकील म्हणून तू मला मान्य नाही असं प्रताप अर्जुनला म्हणतो. 


प्रताप म्हणतो,"मला असा वकील नको जो खरा गुन्हेगार न शोधता एका चांगल्या आणि सभ्य गृहस्थाला गुन्हेगार ठरवण्यासाठी आपली शक्ती आणि वेळ वाया घालवेल". त्यानंतर अर्जुन प्रतापला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. पण प्रताप मात्र त्याचं काहीही ऐकून घेत नाही.


सायलीच्या हातचं खाण्यास पूर्णा आजीचा नकार


मालिकेत दुसरीकडे सायलीच्या हातचं खाण्यास पूर्णा आजी नकार देताना दिसून येत आहेत. कल्पना पूर्णा आजीला समजावण्याचा प्रयत्न करते. पण त्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. कुटुंब तुटण्यास सायली जबाबदार असल्याचं पूर्णा आजीला वाटतं. त्यामुळे कल्पना पूर्णा आजीसाठी जेवन बनवते. 


प्रिया पुढे-पुढे करण्याची एक संधी सोडत नाही...


'ठरलं तर मग' या मालिकेत प्रिया पुढे-पुढे करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. मालिकेच्या आजच्या भागात प्रिया लॉनमध्ये बसलेली असताना तिथे रविराज येऊन तिला सँडीबद्दल (खोटा प्रियकर) विचारतो. सँडीबद्दल विचारल्याने प्रिया घाबरते. 






'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत काही आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. 'ठरलं तर मग' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून नंबर वन वर आहे. आता मालिकेच्या आगामी भागांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सायली आणि अर्जुनच्या नात्यातले बरेचसे पैलू मालिकेच्या यापुढील भागांमधून उलगडणार आहेत. 'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता पाहू शकतात. 


संबंधित बातम्या


Tharala Tar Mag : सायलीने केला निर्धार महिमत-साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा; 'ठरलं तर मग'च्या आजच्या भागात काय घडणार? प्रोमो आऊट