Miss World 2024 Winner Krystyna Pyszkova : 'मिस वर्ल्ड 2024'चा (Miss World 2024) दिमाखदार महाअंतिम सोहळा नुकताच मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये पार पडला. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा (Krystyna Pyszkova) यंदाची विश्वसुंदरी ठरली आहे. गेल्या 28 वर्षात भारतात या महाअंतिम सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. देशासह परदेशातील अनेक मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते. क्रिस्टिना पिस्कोव्हाने विश्वसुंदरीचा किताब पटकावल्यानंतर ती नक्की कोण आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 


कोण आहे 'मिस वर्ल्ड 2024' क्रिस्टिना पिस्कोव्हा? (Who is Miss World 2024 Winner Krystyna Pyszkova)


'मिस वर्ल्ड 2024'चा (Miss World 2024) किताब आपल्या नावे करणाऱ्या क्रिस्टिना पिस्कोव्हाचा जन्म 19 जानेवारी 1999 मध्ये झाला. क्रिस्टिना अजूनही वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. अभ्यास करताना मॉडेलिंगमध्ये तिला रुची निर्माण झाली. क्रिस्टिनाची स्वत:ची संस्था आहे. 'क्रिस्टिना पिस्कोव्हा फाऊंडेशन' (Krystyna Pyszkova Foundation) असं या संस्थेचं नाव आहे. टांझानियातील वंचित मुलांसाठी तिने अनेक चांगली कामे केली आहेत. गरीब विद्यार्थ्यांसाठी तिने शाळा सुरू केली आहे. ही शाळा क्रिस्टिना स्वत: चालवते.






मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशननुसार, क्रिस्टिना सामाजिक संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करते. 'मिस वर्ल्ड 2024'चा प्रवास क्रिस्टिनासाठी खूप खडतर होता. पण तरीही तिने चांगलं यश मिळवलं आहे. क्रिस्टिनासाठी हा नक्कीच अभिमानास्पद क्षण होता.


क्रिस्टिना पिस्कोव्हाला काय बक्षीस मिळालं? (Krystyna Pyszkova Prize Money)


71 व्या 'मिस वर्ल्ड 2024'ची क्रिस्टिना पिस्कोव्हाला विजेती ठरली आहे. क्रिस्टिनाला घातलेला मुकूट हा 82 ते 85 लाख रुपयांचा होता. हा मुकूट फक्त एका वर्षासाठी विजेत्या स्पर्धकाकडे राहतो. त्यानंतर दुसऱ्या विजेत्याला तो द्यावा लागतो. क्रिस्टिना पिस्कोव्हाला 10 कोटी रुपयांच बक्षीस मिळालं आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आली नाही. 


क्रिस्टिना पिस्कोव्हाला सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. व्यावसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यासंबंधित विविध अपडेट्स ती शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिने 181K फॉलोअर्स आहेत.


संबंधित बातम्या


Miss World 2024 Krystyna Pyszkova : "मिस वर्ल्ड 2024'चा किताब जिंकणं माझ्यासाठी स्वप्नवत"; विश्वसुंदरीचा बहुमान मिळताच क्रिस्टिना पिस्कोव्हाची पहिली प्रतिक्रिया