Miss World 2024 Krystyna Pyszkova : 'मिस वर्ल्ड 2024'चा (Miss World 2024) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. 71 व्या सोहळ्याचं भारतात आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा (Krystyna Pyszkova) यंदाची विश्वसुंदरी ठरली आहे.


क्रिस्टिना पिस्कोव्हाची पहिली प्रतिक्रिया (Krystyna Pyszkova First Reacion)


विश्वसुंदरीचा किताब आपल्या नावे केल्यानंतर क्रिस्टिना पिस्कोव्हा म्हणाली,"ज्या क्षणाची मी प्रतीक्षा करत होते अखेर तो आला आहे. त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यामुळे सामाजिक कार्यात मला मदत करता येणार आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकणं माझ्यासाठी स्वप्नवत होतं".






क्रिस्टिना पिस्कोव्हा म्हणाली,"माझा आनंद तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेत होते. सामाजिक काम मी यापुढेही करत राहणार आहे. यापुढे मी अधिक चांगलं काम करत राहणार आहे. मिस वर्ल्डची सर्वात मोठी खासियत म्हणजे या माध्यमातून आम्हाला जगभरातील 'बहिणींना' भेटण्याची संधी मिळते. 


माझ्या यशात बहिणीचा मोठा वाटा : क्रिस्टिना पिस्कोव्हा


क्रिस्टिना पिस्कोव्हा पुढे म्हणाली,"मला माहित आहे की या प्रवासात प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे मला सर्वांचाच खूप अभिमान वाटतो. मला आशा आहे की आपण सर्वजण दीर्घकाळ एकमेकांच्या संपर्कात राहू. हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही. भारताने मला चांगल्या आठवणी दिल्या आहेत. मी मेहनत घेत असले तरी मी जिंकू शकेल असं मला वाटलं नव्हतं. खरंतर बहिणीमुळे माझा हा प्रवास सुरू झाला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची माझी हिंमत नव्हती. पण बहिणीच्या पाठिंब्यामुळे आज मी इथे उभी आहे".


‘मिस वर्ल्ड 2024’च्या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी 12 सदस्यांकडे होती. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री कृती सेनॉन (Kriti Sanon), पूजा हेगडे (Pooja Hegde), मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, बँकर, गायिका व समाजसेविका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis), चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, पत्रकार रजत शर्मा, बेनेट, कोलमन अँड को. लिमिटेडचे डिरेक्टर विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेअरमन आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर, हॉस्ट जामिल सैदी यांचा समावेश होता. 


संबंधित बातम्या


Miss World 2024 : चेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली यंदाची विश्वसुंदरी, क्रिती सॅनॉन आणि पूजा हेडगेसह अमृता फडणवीसांनी निवडली यंदाची 'मिस वर्ल्ड'