एक्स्प्लोर

Jhimma 2 Teaser: इंदू डार्लिंगच्या 75 व्या वाढदिवसाला कोण कोण येणार? 'झिम्मा-2' चा टीझर रिलीज

Jhimma 2 Teaser: काही दिवसांपूर्वी झिम्मा-2 या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

Jhimma 2 Teaser: 'झिम्मा' (Jhimma) या मराठी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामधील गाण्यांना आणि चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता झिम्मा चित्रपटाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी झिम्मा-2 या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

'झिम्मा-2' चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला दिसते, सिद्धार्थ म्हणतो, "देवा, लक्षात ठेव हा!" त्यानंतर तो मोबाईलमध्ये मेसेज टाईप करायला सुरुवात करतो. 'बायांनो पुढच्या ट्रीपची तयारी करायला घ्या कारण आहे, इंदू डार्लिंगचा 75 वा वाढदिवस, जो तिला आपल्यासोबत सेलिब्रेट करायचा आहे आणि तिच्याकडे एक सरप्राइज आहे. चला!', असा मेसेज सिद्धार्थ टाईप करतो. त्यानंतर तो हा मेसेज सेंड करतो. मग सिद्धार्थच्या फोनवर मेसेजचे नोटिफिकेशन्स येतात. टीझरच्या शेवटी एक फोटो फ्रेम दिसत आहे. 

'झिम्मा-2' चित्रपटाचा टीझर शेअर करुन  सिद्धार्थ चांदेकरनं कॅप्शनमध्ये लिहिलं,  "आता खेळ सुरू… इंदू डार्लिंग च्या 75 व्या वाढदिवसासाठी कोण कोण येणार? लवकरच कळणार…'झिम्मा-2' 24 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात"

पाहा टीझर

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

'झिम्मा-2' हा चित्रपट 24 नोव्हेंबर  रोजी रिलीज होणार आहे. झिम्मा या चित्रपटात  सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सयाली संजीव, मृण्मयी गोडबोले  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता 'झिम्मा-2' या चित्रपटात कोणकोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 'झिम्मा' या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने (Hemant Dhome) केले होते. 

काही दिवसांपूर्वी एक खास पोस्ट शेअर करुन हेमंत ढोमेनं 'झिम्मा-2'  या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं होतं, ' प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाहीत.पण मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात. पण त्यासाठी REUNION महत्त्वाची! आणि आपली REUNION होणार 24 नोव्हेंबर पासून! भेटूया चित्रपटगृहात… (मागच्या खेपेसारखं)'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

इतर महत्वाच्या बातम्या:

Jhimma 2 : "त्या परत येतायत"; 'झिम्मा 2'ची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी होणार रिलीज


 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Epstein Files Swaroop sawant: रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
Facebook Dindis New Devotional Song: विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
Amitabh Bachchan On French Football Team: 'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
Zubair khan on Bigg boss 11: 'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Embed widget