Jhimma 2:  'झिम्मा' (Jhimma) या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटामधील गाणी, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटाचे कथानक या सगळ्यांच गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आता  झिम्मा चित्रपटाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  काही दिवसांपूर्वी झिम्मा-2 या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले. या पोस्टरवर अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) दिसली. नुकतीच एका नेटकऱ्यानं झिम्मा-2 आणि रिंकू यांच्याबाबत एक कमेंट केली. या कमेंटला अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं (Siddharth Chandekar) दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


झिम्मा-2 या चित्रपटाचं पोस्टर सिद्धार्थ चांदेकरनं सोशल मीडियावर शेअर केलं. या पोस्टरवर अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत,क्षिती जोग,सुचित्रा बांदेकर,सयाली संजीव, रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे दिसत आहेत. या पोस्टरला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आम्ही या चित्रपटाची वाट बघत आहोत पण रिंकू राजगुरु या चित्रपटाची मज्जा घालवणार नाही, अशी आशा व्यक्त करतो."  नेटकऱ्याच्या या कमेंटला सिद्धार्थनं रिप्लाय दिला, 'अरे ती मज्जा  घालवणार नाही. तिने कडक काम केले आहे.'






'झिम्मा-2' कधी होणार रिलीज?



झिम्मा या चित्रपटात  सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सयाली संजीव, मृण्मयी गोडबोले  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती.  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.  आता प्रेक्षक झिम्मा-2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'झिम्मा-2' हा चित्रपट 24 नोव्हेंबर  रोजी रिलीज होणार आहे. 


'झिम्मा-2' चित्रपटाचा टीझर देखील काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरच्या सुरुवातीला दिसते, सिद्धार्थ म्हणतो, "देवा, लक्षात ठेव हा!" त्यानंतर तो मोबाईलमध्ये मेसेज टाईप करायला सुरुवात करतो. 'बायांनो पुढच्या ट्रीपची तयारी करायला घ्या कारण आहे, इंदू डार्लिंगचा 75 वा वाढदिवस, जो तिला आपल्यासोबत सेलिब्रेट करायचा आहे आणि तिच्याकडे एक सरप्राइज आहे. चला!', असा मेसेज सिद्धार्थ टाईप करतो. त्यानंतर तो हा मेसेज सेंड करतो. 'झिम्मा-2' या चित्रपटाच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.


इतर महत्वाच्या बातम्या:


Jhimma 2 : 'झिम्मा 2'मध्ये रिंकू राजगुरूची एन्ट्री! परश्या असणार सिद्धार्थ चांदेकर?