Deepika Padukone And Ranveer Singh: करण जोहरच्या  (Karan Johar)  कॉफी विथ करण 8  (Koffee With Karan 8)  या कार्यक्रमाचा  पहिला एपिसोड रिलीज झाला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी हजेरी लावली आहे. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. या जोडप्याने इटलीमध्ये लग्न केले. दीपवीरने त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण आता त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याचा व्हिडीओ कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये देखील दाखवण्यात आला आहे.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दीपिका आणि रणवीरच्या लग्नासोहळ्याच्या व्हिडीओची सुरुवात त्यांच्या एंगेजमेंट पार्टीपासून होते. ज्यामध्ये रणवीर हा दीपिकावरील प्रेम व्यक्त करतो. त्यानंतर दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण म्हणतात की, रणवीरने आपल्या कंटाळवाण्या एक्सायटमेंट आणली आहे.


दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नसोहळ्यातील सर्व फंक्शन्स व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहेत. मेहेदी सोहळ्यात रणवीर आणि दीपिकाचा  रोमँटिक अंदाज दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये रणवीर डान्स देखील करताना दिसत आहे.


पाहा व्हिडीओ:






इटली येथे लग्नानंतर दीपिका आणि रणवीरने बेंगळुरू आणि मुंबईत रिसेप्शन दिले. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड  सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यात केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले होते.


काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रोमोमध्ये रणवीर आणि दीपिका हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसले. ज्यामध्ये दिसले की,  करण जोहर हा दीपिकाला विचारतो," तुला रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील रॉकी रंधावाला डेट करायला आवडेल का?". यावर  दीपिका उत्तर देते  "मी रॉकी रंधावासोबत लग्न केलं आहे" त्यानंतर रणवीर सिंह खुलासा करत म्हणतो की,"2015 मध्ये मी दीपिकाला प्रपोज केले होते". यावर हसत दीपिका म्हणते,"अॅडव्हान्स बुकिंग"


इतर महत्वाच्या बातम्या:


Koffee With Karan 8 : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा साखरपुडा 2015 मध्येच झालेला;'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर अभिनेत्याचा खुलासा