Jhimma 2 : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा बहुचर्चित मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) एन्ट्री झाली आहे. 


'झिम्मा 2'चं नवं पोस्टर आऊट! (Jhimma 2 New Poster Out)


'झिम्मा 2' या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे. नव्या पोस्टरमध्ये सायली संजवी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, निर्मिती सावंत, सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी व शिवानी सुर्वे के कलाकार दिसत आहेत. यावरुनच 'झिम्मा 2' या सिनेमात रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि शिवानी सुर्वे (Shivani Surve) या अभिनेत्रींची एन्ट्री झाल्याचे स्पष्ट होत आहे.






'झिम्मा 2' या सिनेमाचं पोस्टर शेअर करत हेमंत ढोमेने लिहिलं आहे,"तिच मज्जा आहे दुसऱ्याही डावात…आईच्या नाही… आज्जीच्याही गावात! तुमचे आमचे REUNION.. बरोबर एक महिन्यात…
24 नोव्हेंबर पासून चित्रपटगृहात! झिम्माच्या मॅड फॅमिलीत तुमचं स्वागत आहे रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे". 


आर्चीचा परश्या सिद्धार्थ चांदेकर असणार का? 


हेमंत ढोमेने शेअर केलेल्या पोस्टवर एका चाहतीने लिहिलं आहे,"अगं बाई पाटील आर्ची एडिशन आहे का यात...मग परश्या सिद्धार्थ असणार का?". यावर उत्तर देत हेमंत ढोमेने लिहिलं आहे,"हो..या बायांमुळे तो विहिरीत उडी मारणारच आहे एकदिवस..काय रे सिद्धार्थ". यावर चाहतीने लिहिलं आहे,"कधी मारणार ते सांगा...मिताली येऊन मानेवर बसेल त्याच्या". 


'झिम्मा 2' कधी प्रदर्शित होणार? (Jhimma 2 Release Date)


‘झिम्मा 2’ हा सिनेमा येत्या 24 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद एल. राय व क्षिती जोग यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.


रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या लोकप्रिय अभिनेत्रींची 'झिम्मा 2' या सिनेमात एन्ट्री झाल्याने सिनेप्रेमींची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता या दोघी सिनेमात काय रंग भरणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 'झिम्मा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे 'झिम्मा 2' किती गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'बाईपण भारी देवा'नंतर 'झिम्मा 2' पाहायला महिलावर्ग मोठ्या प्रमाणात जाईल.


संबंधित बातम्या


Jhimma 2 Teaser: इंदू डार्लिंगच्या 75 व्या वाढदिवसाला कोण कोण येणार? 'झिम्मा-2' चा टीझर रिलीज