London Misal: जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' (London Misal) हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) हा महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधवनं पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
'लंडन मिसळ' चित्रपटाची स्टार कास्ट
'लंडन मिसळ' या चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असेल. आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची कथा 'लंडन मिसळ' या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. गौरव मोरे यांनी 'लंडन मिसळ' या चित्रपटाचं पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तिखट तर्री घालून 440 व्होल्टचा झटका द्यायला येत आहे. 'लंडन मिसळ' फॅमिली मनोरंजनाची झणझणीत मेजवानी! 8 डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात'
'लंडन मिसळ' कधी होणार रिलीज?
'लंडन मिसळ' हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. 'लंडन मिसळ' या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत तर सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे, तर सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केले आहे.पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे तर साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं 'लंडन मिसळ' चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे. तसेच, चित्रपटाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.
संबंधित बातम्या: