Jhimma 2 Box Office Collection Day 4 : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. एकीकडे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा प्रदर्शित झालेला असताना 'झिम्मा 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. 'झिम्मा 2' या सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने पाच कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
'झिम्मा 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jhimma 2 Box Office Collection)
'झिम्मा 2' हा सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'झिम्मा 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 0.95 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. या सिनेमाने 1.77 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी 2.5 कोटी आणि चौथ्या दिवशी 0.75 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 5.52 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पहिला दिवस : 0.95 कोटी
दुसरा दिवस : 1.77 कोटी
तिसरा दिवस : 2.5 कोटी
चौथा दिवस : 0.75 कोटी
एकूण कमाई : 5.52
प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे : हेमंत ढोमे
हेमंत ढोमेने (Hemant Dhome) 'झिम्मा 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाला मिळणाऱ्या यशाबद्दल हेमंत म्हणतो,"
प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत आहोत खूप ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आवर्जून भेटायला येत असून सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. प्रेक्षकांकडून ‘झिम्मा 2'वर होणारा कौतुकाचा वर्षाव भारी फिलिंग देणारा आहे".
तगडी स्टारकास्ट असलेला 'झिम्मा 2'
'झिम्मा 2' या सिनेमाची स्टारकास्ट खूपच तगडी आहे. या सिनेमात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सर्वच कलाकारांनी आपली भूमिका चोख निभावल्याने, उत्तम लेखन आणि दिग्दर्शन असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
'झिम्मा 2' हा सिनेमा पाहायला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सिनेमागृहाकडे जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरातून या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'झिम्मा' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता 'झिम्मा 2' हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.
संबंधित बातम्या