Jhalak Dikhla Ja 11 : 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhla Ja 11) हा डान्स रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. आज 2 मार्च 2024 रोजी या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले आज जल्लोषात पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये मनीषा रानी, शोएब इब्राहिम, श्रीराम चंद्रा, अद्रिजा सिन्हा आणि धनश्री वर्मा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


मनीषा रानी होणार 'झलक दिखला जा 11'ची विजेती? 


मीडिया रिपोर्टनुसार,'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमाच्या विजेत्याचं नाव आता समोर आलं आहे. मनीषा रानी (Manisha Rani) या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे. धनश्री वर्मा, शोएब इब्राहिम, श्री राम चंद्रा आणि अधिरजा साहनी या स्पर्धकांना मागे टाकत मनीषा रानीने 'झलक दिखला जा 11'ची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


'झलक दिखला जा 11'च्या विजेत्यांना काय मिळणार? (Jhalak Dikhla Ja 11 Prize Money)


'झलक दिखला जा 11'च्या विजेत्याला ट्रॉफीसह सोनी टीव्हीकडून 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. पैसे आणि ट्रॉफीसह विजेत्याला अबू धाबीची मोफत टूर मिळणार आहे. 'झलक दिखला जा 11'चा ग्रँड फिनाले 2 मार्च 2024 रोजी रात्री 8 ते 12 च्या दरम्यान पार पडणार आहे. या कार्यक्रमात मलायका अरोरा, फराह खान आणि अरशद वारसी विजेत्याची घोषणा करणार आहेत. 






'झलक दिखला जा 11'चा ग्रँड फिनाले दोन दिवस पार पडणार आहे. हा कार्यक्रम प्रेक्षक सोनी टीव्हीवर पाहू शकतात. तसेच सोनी लिव्ह अॅपच्या माध्यमातून प्रेक्षकांना मोबाईलवरदेखील हा कार्यक्रम पाहता येईल. 


मनीषा रानीच्या डान्सने जिंकली प्रेक्षकांची मने


'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमातील मनीषा रानीच्या डान्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांसह परिक्षकांदेखील तिने जिंकून घेतलं आहे. मनीषाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. डान्स रिअॅलिटी शोआधी मनीषा 'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2) मध्ये दिसून आली होती. मनीषाचं सोशल मीडियावर चांगलं फॅन फॉलोइंग आहे. मनीषाने आपल्या करिअरची सुरुवात नृत्यांगना म्हणून केली होती.


संबंधित बातम्या


Shiv Thakare : शिव ठाकरे म्हणतोय 'हा' प्रवास फक्त ट्रॉफी जिंकण्यासाठी नाही; नेमकं प्रकरण काय?