Priyanka Chopra : बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) कधी आपल्या अभिनयाने तर कधी वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असते 'देसी गर्ल' प्रियांकाने आता आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता अभिनेत्रीने घोषणा आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली असून तिचे काही चाहते मात्र नाराज झाले आहेत. प्रियांकाचा आगामी सिनेमा हा बॉलिवूडट नसून हॉलिवूडपट आहे. 


प्रियांकाने केली नव्या सिनेमाची घोषणा (Priyanka Chopra New Movie)


प्रियांका चोप्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने लिहिलं आहे,"मला आशा होती की जर मी जिवंत राहिले आणि देवाची इच्छा असेल तर आपल्याला देखील समुद्री डाकू बनण्याची संधी मिळेल".


प्रियांकाच्या 'द ब्लफ'बद्दल जाणून घ्या.. (The Bluff Movie Details)


'द ब्लफ'चं कथानक 19 व्या शतकातील कॅरेबियन फेजवर आधारित आहे. एका माजी महिला समुद्री डाकूची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. कुटुंबियांची रक्षा करण्यासाठी धडपडणारं प्रियांकाचं पात्र आहे. अत्यंत रहस्यमय असा हा सिनेमा आहे. फ्रँक ई फ्लावर्स या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. फ्रँक ई 'Bob : Marley: One Love' या सिनेमामुळे चर्चेत आला होता. या सुपरहिट सिनेमाचं त्याने लेखन केलं होतं. 




प्रियांकाच्या नव्या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता


'द ब्लफ' हा सिनेमा काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आता अभिनेत्रीने या सिनेमावर भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने वर्कआऊट करतानाचा एक मिरर सेल्फी इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. फोटो शेअर करत तिने लिहिलं होतं,"सेटवर मी पुन्हा आले असून काम सुरू केलं आहे". अभिनेत्रीच्या या पोस्टनंतर चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.


प्रियांका चोप्राच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Priyanka Chopra Upcoming Movies)


मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्राच्या 'The Bluff' या सिनेमाचं शूटिंग ऑस्ट्रेलियामध्ये होणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमासह अभिनेत्री 'To Kill A Tiger' या माहितीपटामुळे चर्चेत आहे. या माहितीपटाची ती निर्मिती करणार आहे. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांच्या यादीत 'हेड ऑफ स्टेट' आणि 'सिटाडेल 2' या सिनेमांचा समावेश आहे.


संबंधित बातम्या


Priyanka Chopra On To Kill a Tiger: प्रियांका चोप्राने चाहत्यांना दिली गुडन्यूज, देसी गर्ल झाली 'या' ऑस्कर डॉक्युमेंट्रीचा भाग