Jeet Adani Diva Shah Wedding : दिग्गज उद्योगपती गौतम अदाणी यांचा लहान मुलगा जीत अदाणी यांच्या विवाहाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. त्यांचा 12 मार्च 2023 रोजी साखरपूडा झाला होता. दरम्यान, आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.


येत्या 7 फेब्रुवारीला गौतम अदाणींच्या मुलाचे लग्न


गौतम अदाणी नुकतेच प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात जाऊन आले. या ठिकाणी त्यांने सेवाकार्य केले. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाच्या विवाहाबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 7 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचा लहान मुलगा जीत अदाणी यांचा विवाह होणार आहे. त्यासाठी तयारीदेखील चालू झाली आहे. 


जीत अदाणी यांचे लग्न कोणाशी होणार? 


 जीत अदाणी यांचा 12 मार्च 2023 रोजी दिवा जैमीन शाह यांच्याशी साखरपुडा झाला होता. दिवा शाह ही हिऱ्याचे व्यापारी जैमीन शाह यांची कन्या आहे. साखरपुडा झाल्यानंतर त्यांनी आपले नाते अद्याप सार्वजनिक केले नव्हते. आता मात्र खुद्द गौतम अदाणी यांनीच जीत अदाणी यांच्या लग्नाबाबत माहिती दिली आहे. 


गौतम अदाणी यांनी काय माहिती दिली?


जीतचे लग्न 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आमची काम करण्याची पद्धत सामान्य माणसाप्रमाणे आहे. जीत आज कुंभमेळ्यात आला होता. त्याचे लग्न पारंपरिक आणि साधारण पद्धतीने होणार आहे. या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटी येणार नाहीत. हे लग्न कुटुंबीयांमध्येच होणार आहे. 


गौतम अदाणीही मुलाच्या लग्नात कोट्यवधीचा खर्च करणार?


दरम्यान, याआधी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गेल्या वर्षी 12 जुलै 2024 रोजी पार पडला होता. या विवाह सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी देश-विदेशातले दिग्गज चेहरे भारतात आले होते. कित्येक दिवस या विवाहाचीच सगळीकडे चर्चा होती. त्यानंतर आता अंबानी यांच्याच पंक्तीत बसणारे गौतम अदाणी यांच्या मुलाचा विवाह होणार आहे. त्यांनी हा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र तरीदेखील  या विवाहासाठी नेमका काय तामझाम असणार? याची आता सगळीकडे चर्चा चालू झाली आहे. 


हेही वाचा :


दिग्गज उद्योगपती सपत्नीक कुंभमेळ्यात, सेवाकार्यात सहभाग, भाविकांना प्रसादही वाटला!


Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अंबानींच्या सुनेच्या या गोष्टी माहीत आहेत का?


Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : राजेशाही सोहळ्याचा अनोखा साज, अनंत-राधिका लग्नबंधनात