दिग्गज उद्योगपती सपत्नीक कुंभमेळ्यात, सेवाकार्यात सहभाग, भाविकांना प्रसादही वाटला!
सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा चालू आहे. या महाकुंभमेळ्यात देशभरातून भाविक येत असून पवित्र स्नान करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरातली रोज या ठिकाणी हजारो भाविक येऊन पवित्र स्नान करत आहेत. विशेष म्हणजे या सर्व भाविकांची काळजी घेण्यासाठी येथे सर्व सोय करण्यात आली आहे.
याच महाकुंभमेळ्यात देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदाणी यांनी हजेरी लावली आहे. त्यांनी कुंभमेळ्यात इस्कॉन मंदिरा प्रशासनातर्फे चालवण्यात येत असलेल्या शिबिराला भेट दिली आहे.
या शिबिरात जाऊन गौतम अदाणी यांनी सेवा कार्यात सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी महाप्रसाद तयार करण्यासाठी मदतही केली. विशेष म्हणजे त्यांनी महाप्रसादाचे सेवनही केले.
यावेळी गौतम अदाणी यांची पत्नीदेखील सोबत होते. या दोघांनीही भाविकांना प्रसादाचे वाटप केले.
महाकुंभमेळ्यात गौतम अदाणी यांनी सपत्निक भगवान हनुमानाचे दर्शन घेतले.
गौतम अदाणी त्यांच्या पत्नीसमवेत