Saif Ali Khan First Photo After Fatal Attack : अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून मंगळवारी 19 जानेवारीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याची पहिली झलक समोर आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानचा पहिला फोटो समोर आला आहे. 16 जानेवारी रोजी मध्यरात्री त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफ छोट्या तैमूर आणि इब्राहिमसोबत रुग्णालयात पोहोचला होता.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानची पहिली झलक
सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानचा पहिला फोटो समोर आला आहे. रुग्णालयातू बाहेर पडताना त्याची झलक मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 16 जानेवारीच्या मध्यरात्री सैफ अली खानच्या राहत्या घरी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
पाच दिवसांनंतर सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज
सैफ अली खानला 16 जानेवारीला मध्यरात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर 17 जानेवारीला पहाटे त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केल्यानंतर सैफ गंभीर जखमी झाला होता. आरोपीने त्याच्या पाठीमध्ये खुपसलेल्या चाकूचा तुकडा अडकला होता. हा अडीच इंचाचा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन बाहेर काढला. त्यानंतर त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं.
नेमकं काय घडलं?
सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याच्या प्रयत्नात शरीफुल इस्लाम नावाच्या व्यक्तीने 16 जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घरी घुसखोरी करत त्याच्यावर चाकूहल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. हल्लेखोराने सैफवर सहा वेळा चाकूने वार केले होते आणि यामुळे जेव्हा त्याला ऑटो रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा भरपूर रक्तस्त्राव झाला होता. सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ बिजॉय दास (वय 30 वर्ष) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
हल्लेखोर बांगलादेशातील कुस्तीगीर
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने पोलिसांना सांगितलं की, तो बांगलादेशातील खेळाडू आहे. तो बांगलादेशातील कुस्तीपटू होता. तो कमी वजनाच्या गटात कुस्ती खेळायचा. तो जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती खेळायचा. कुस्तीगीर असल्याने, सैफ अली खानच्या शरीरयष्टीवर तो भारी पडला. बेरोजगारीमुळे भारतात आला, पण इथेही त्याला चांगलं काम मिळालं नाही. त्यानंतर त्याने चोरीचा प्लॅन आखला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Saif Ali Khan Injured : हल्ल्यानंतर करिनानं IPS अधिकाऱ्याऐवजी, 100 वर फोन केला असता तर, 'त्या' रात्रीच...