Jaya Bachchan and Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांच्या अफेअरच्या चर्चांनी सिनेसृष्टीत एका काळात उधाण आणलं होतं.  त्यावेळी रेखा आणि अमिताभ यांचं नात हे वेगळ्या टप्प्यावर सुरु असल्याचं प्रत्येक माध्यमातून सांगण्यात येत होतं. बरं त्यावेळी हे दोन्ही कलाकार त्यांच्या करिअरमध्ये यशाच्या टप्प्यावर होते. पण त्यांच्या या चर्चांमुळे दोघांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागल्याचं म्हटलं जातं. पण इतकं सगळं असूनही त्यांचं नात पुढे गेलं नाही, त्याचं एकमेव कारण म्हणजे जया बच्चन (Jaya Bachchan). 


जया बच्चन यांना अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याची कल्पना आली होती, असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जया बच्चन यांच्या एका निर्णयामुळे अमिताभ आणि रेखा यांचं नातं कमकुवत होत गेलं आणि पुढे गेलंच नाही. पण जया बच्चन यांनी नेमकं काय केलं ज्यामुळे या नात्याला पूर्णविराम लागला, याची उत्सुकता अनेकांना आहे. 


'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?


त्यावेळी अमिताभ आणि जया भादुरी यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर अमिताभ आणि रेखा ही हिट जोडी सिनेसृष्टीत प्रसिद्ध झाली. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांनीही चांगलाच जोर धरला. त्यामुळे असं म्हटलं जातं की, या सगळ्या चर्चांमध्ये जया बच्चन यांनी रेखा यांना एकदा जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. रेखा यांनीही ते स्विकारलं आणि त्या घरी गेल्या देखील होत्या. पण अर्थातच सुरु असलेल्या चर्चांवर जया बच्चन काय बोलणार याची त्यांना भीती होतीच. मात्र जया बच्चन यांनी त्यावेळी बरीच काळजी घेतली. जेव्हा त्या दिवशी सगळं आटोपलं आणि रेखा त्यांच्या घरी जात होत्या तेव्हा जया बच्चन यांनी रेखा यांना एकच वाक्य म्हटलं. 


त्यानंतर सगळं संपलं


त्या दिवशी रेखा घरी जात असताना जया बच्चन यांनी म्हटलं की, मी अमित यांना कधीही सोडणार नाही. त्यामुळे जया बच्चन यांच्या या ठोस निर्णयामुळे अमिताभ आणि  रेखा यांच्यातील नातं कमकुवत होऊ लागल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर अमिताभ यांनी मोहब्बते या सिनेमातूनन त्यांच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आणि नंतर या सगळ्या चर्चा मागे पडू लागल्याचं सांगितलं जातं. 


ही बातमी वाचा : 


Abhishek Gaonkar and Sonalee Gurav : 'सारं काही...' मधील श्रीनूचा झाला साखरपुडा, खऱ्या आयुष्यातली ओवी आहे रील स्टार