Abhishek Gaonkar and Sonalee Gurav Engagement : गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa 2024) मुहूर्तावर अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या नव्या आयुष्याच्या सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यातच अनेक कलाकारांनी या दिवसाचं औचित्य साधत साखरपुडा देखील केला. झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर (Abhishek Gaonkar) याचा देखील नुकताच साखरपुडा पार पडला. अभिषेकने रिल स्टार सोनाली गुरव (Sonalee Gurav) हिच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. 


अभिषेक आणि सोनाली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी त्यांचे एकत्र अनेक फोटोही सोशल मीडियावरुन शेअर केले होते. त्यानंतर आता सोनाली आणि अभिषेक हे दोघे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 9 एप्रिल रोजी या दोघांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.               






साखरपुड्यातील 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष


दरम्यान अभिषेक आणि सोनालीच्या साखरपुड्यातील एका कृतीने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी सोनाली अभिषेकच्या पाया पडली त्याचप्रमाणे अभिषेकही सोनालीच्या पाया पडला. त्यांच्या या कृतीने उपस्थित असलेल्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झालाय.  


अभिषेकच्या कामाबद्दल


अभिषेक हा सध्या झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेत श्रीनिवासची भूमिका साकारत आहे. तसेच त्याने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केल्याचं पाहायला मिळालं. त्याने याआधी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेतही काम केलं. ‘सन मराठी’वर ‘माझी माणसं’ या मालिकेतही तो पाहायला मिळाला. अभिषेकची ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील भूमिका गाजली होती.  अभिषेकची होणारी बायको सोनाली ही रिलस्टार आहे. 






ही बातमी वाचा : 


Amruta Khanvilkar : तेव्हा मला वाटलं आता स्वामी माझ्यासोबत नाही पण..., 'त्या' कठीण काळातील अमृता खानविलकरने सांगितला स्वामी अनुभव