(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jawan Box Office Collection Day 10 : शाहरुखच्या 'जवान'ने बॉक्स ऑफिस जिंकलं; दहा दिवसांत जगभरात केली 700 कोटींपेक्षा अधिक कमाई
Jawan : शाहरुखचा (Shah Rukh Khan) 'जवान' हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Shah Rukh Khan Jawan Box Office Collection Day 10 : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमाची जगभरात चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 10 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. रिलीजच्या दहा दिवसांत या सिनेमाने 700 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
'जवान'चं दहा दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jawan Box Office Collection Day 10)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 75 कोटींची दणदणीत कमाई केली. दुसऱ्या दिवशी 53 कोटी, तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी, चौथ्या दिवशी 80.1 कोटी, पाचव्या दिवशी 32.92 कोटी, सहाव्या दिवशी 26 कोटी, सातव्या दिवशी 23.2 कोटी, आठव्या दिवशी 21.6 कोटी, नवव्या दिवशी 19.1 कोटी आणि रिलीजच्या दहाव्या दिवशी या सिनेमाने 31.50 कोटींची कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 440.48 कोटींची कमाई केली असून जगभरात या सिनेमाने 725 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस : 75 कोटी
- दुसरा दिवस : 53 कोटी
- तिसरा दिवस : 77.83 कोटी
- चौथा दिवस : 80.1 कोटी
- पाचवा दिवस : 32.92 कोटी
- सहावा दिवस : 26 कोटी
- सातवा दिवस : 23.2 कोटी
- आठवा दिवस : 21.6 कोटी
- नववा दिवस : 19.1 कोटी
- दहावा दिवस : 31.50 कोटी
- एकूण कमाई : 440.48 कोटी
- जगभरातील कमाई : 725 कोटी
'जवान'बद्दल जाणून घ्या... (Jawan Movie Details)
'जवान' या सिनेमाची कथा वडील-मुलाच्या नात्यावर आधारित आहे. पण हा सिनेमा राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणारा आहे. 'जवान' या सिनेमात शाहरुख खान वेगवेगळ्या रुपात दिसला आहे. 'जवान' या सिनेमात शाहरुख खान आणि नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत. तसेच रिद्धी डोगरा, प्रियामणी, लहर खान आणि सान्या मल्होत्रा हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दीपिका पदुकोणचा एक खास कॅमिओदेखील प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळेल.
शाहरुखच्या 'डंकी'ची चाहत्यांना उत्सुकता
'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) या सिनेमानंतर शाहरुख खानचा 'डंकी' (Dunky) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. येत्या ख्रिसमसला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. राजकुमार हिरानी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने शाहरुख आणि राजकुमार यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. या सिनेमात किंग खानसोबत तापसी पन्नू महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. शाहरुख खानच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या