Janhvi Kapoor Photo Viral on Vulgur Sites : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आपल्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी सध्या आपल्या आगामी 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील एक हृदयद्रावक किस्सा शेअर केला आहे. जान्हवीने खुलासा केला आहे की, वयाच्या 13 वर्षी तिचे काही फोटो अश्लील साईट्सवर व्हायरल झाले होते. धर्मा प्रोडक्शनने युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर करण जोहरसोबत बोलताना दिसत आहे. तसेच सह-अभिनेता राजकुमार रावदेखील तिच्यासोबत दिसत आहे. करण जोहरसोबत बोलताना जान्हवी कपूर म्हणते,"मीडियाच्या एका गोष्टीमुळे मला वैताग आला होता".
अश्लील साईट्सवर लीक झालेले जान्हवीचे फोटो (Janhvi Kapoor Photo Viral on Vulgur Sites)
जान्हवी कपूर म्हणाली,"मी वयाच्या 12-13 व्या वर्षी आई-बाबांसोबत एका इव्हेंटला गेले होते. त्यावेळी इंस्टाग्राम सुरू झालं होतं. दरम्यान मी इंस्टावर शेअर केलेले फोटो एका अश्लील साईटवर लीक झाले. तेव्हा शाळेतील मुलंही माझ्यावर हसत होते".
आपल्या ड्रेसिंग सेन्सबद्दल जान्हवी काय म्हणाली?
जान्हवी कपूरने पुढे ड्रेसिंग सेन्सबद्दल भाष्य केलं. जान्हवी म्हणाली,"मला एका स्पेसिफिट पद्धतीचे कपडे परिधान करायला आवडतात. माझा जन्मही सिनेसृष्टीशी संबंधित घरात झाला आहे. त्यामुळे मी काय कपडे परिधान करायचे यावर कोणाचं बंधन नसतं. मला कोणी जर्ज करत नाही. कंफर्टेबल कपडे घालण्यावर माझा भर असतो".
जान्हवीच्या 'मिस्टर अँड मिसेज माही'ची चाहत्यांना उत्सुकता (Janhvi Kapoor Upcoming Movie)
जान्हवी कपूरचा आगामी 'मिस्टर अँड मिसेज माही' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री राजकुमार रावच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. 31 मे 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शरण शर्माने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहेत. याआधी ते 'रुहीं'मध्ये एकत्र दिसले होते. जान्हवी कपूर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. 'धडक' या चित्रपटाच्या माध्यमातून 2018 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवीच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या