Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीनने नेहमीच आपल्या संघर्षातील दिवसांवर खुलेपणाने भाष्य केलं आहे. काहीतरी करायची, नाव कमवायची धडपड नवाज करत असे. करिअरच्या सुरुवातीला नवाजला अनेक रिजेक्शन मिळत होते. नवाजुद्दीन जेव्हा म्हणायचा की एक दिवस मी मोठा स्टार होईल तेव्हा गाववाले त्याच्यावर हसायचे. नवाजुद्दीनने अनेक मुलाखतींत आपला संघर्ष आणि यशाबद्दल भाष्य केलेलं आहे. 


नवाजुद्दीनचा जन्म 19 मे 1974 मध्ये बुढानामध्ये झाला आहे. नवाजुद्दीन उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना या गावातील आहे. एका सामान्य मुस्लिम कुटुंबात त्याचा जन्म झाला. पण आपल्या टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. 


नवाजुद्दीन सिद्दीकीचं 'असं' आहे फॅमिली बॅकग्राऊंड


नवाजुद्दीन सिद्दीकीचा जन्म एक जमींदार मुस्लिम कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्याने गरीबी अनुभवली आहे. नवाज एका घारत आपले आई-वडील आणि 8 भाऊ-बहिणींसोबत राहायचा. नवाजचं तरुणपण उत्तराखंडमध्ये गेलं आहे. दोन वेळा त्याचं लग्न झालं आहे. नवाजचं पहिलं लग्न 2007 मध्ये मोडलं. त्यानंततर 2010 मध्ये त्याने आलियासोबत संसार थाटला. शोरा आणि यानी सिद्दीकी हे नवाजचे दोन मुलं आहेत. नवाजने हरिद्वार येथील गुरुकुल कांगरी युनिवर्सिटीमधून केमिस्ट्रीमध्ये बॅचलरची डिग्री मिळवली आहे. त्यानंतर काही दिवस तो वडोदरामध्ये थिएटर करायला गेला. पुढे त्याला दिल्लीतील NSD मध्ये अॅडमिशन मिळालं. एनएसडीमध्ये नवाजचा एक ग्रुप तयार झाला होता. वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन ते नाटक सादर करत असे. 


नवाजुद्दीन सिद्दीकीचा संघर्ष


नवाजुद्दीन सिद्दीकी 1999 मध्ये दिल्लीहून मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर गोरेगावमध्ये तो राहायचा. प्रचंड संघर्षानंतर नवाजुद्दीनला एक चित्रपट मिळाला. या चित्रपटात तो छोट्या भूमिकेत दिसला. आमिर खानच्या 'सरफरोश' चित्रपटात तो झळकला. त्यानंतर नवाज राम गोपाल वर्माच्या शूल आणि जंगल नामक चित्रपटांत छोट्या-मोठ्या भूमिका करताना दिसून आला. 2003 मध्ये आलेल्या मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातही नवाजला एक छोटी भूमिका मिळाली होती. आठ वर्षांच्या संघर्षानंतरही नवजला मोठा ब्रेक मिळत नव्हता. पुढे गँग्स ऑफ वासेपुर चित्रपटात नवाजला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला.  बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. 


नवाजुद्दीन सिद्दीकीचं फिल्मी करिअर


'गँग्स ऑफ वासेपुर'नंतर नवाजुद्दीन सिद्दीकीला इंडस्ट्रीतील लोक ओळखू लागले. नवाजने किक, तलाश, रईस, बजरंगी भाईजान, मांझी, हीरोपंती 2, बंदूकबाज, ठाकरे, मॉम, कहानी आणि हाऊसफुल 4 सारख्या चित्रपटांमध्ये नवाजने काम केलं आहे. 


नवाजुद्दीन सिद्दीकीचं नेटवर्थ (Nawazuddin Siddiqui Networth)


नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता म्हणून काम करतो. मीडिया रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकी एका चित्रपटासाठी 10-12 कोटी मानधन घेतो. जाहिरातीसाठी नवाजला 1-2 कोटी रुपये मिळतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो चांगली कमाई करतो. मीडिया रिपोर्टनुसार, नवाजुद्दीनची एकूण संपत्ती 120 कोटी रुपये आहे.


संबंधित बातम्या


Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी