Chandu Champion Trailer Out : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) काही दिवसांपासून त्याच्या बहुचर्चित 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं. अभिनेत्याचा पहिला लूक पाहून चाहते आता चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिकच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. 


'चंदू चॅम्पियन'च्या ट्रेलरमधील कार्तिक आर्यनच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ट्रेलरमध्ये भावना, अॅक्शन, वॉर सीक्वेंस याच्यासह एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यात आला आहे. 


'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर आऊट! (Chandu Champion Trailer Out)


बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये 1965 त्या हल्ल्यात चंदूला 9 गोळ्या लागतात आणि तो कोमात जातो हे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर चंदूचं बालपण दाखवण्यात आलं आहे. चंदूला चॅम्पियन व्हायचं असतं आणि मेडल मिळवायचं असतं. पण लहानपणी चंदूची मजा घेतली जाते. त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. गोल्ड मेडलिस्ट ते आर्मी ऑफिसरपर्यंतचा प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.






कोण आहे मुरलीकांत पेटकर? 


मुरलीकांत पेटकर भारतातील पहिले पैरालंपिक गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी 50 मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग स्पर्धेत 37.33 सेकंडचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. मुरलीकांत यांनी फक्त बॉक्सिंग नव्हे तर स्विमिंग, टेबल टेनिस सारख्या खेळांचीदेखील आवड आहे. 


'चंदू चॅम्पियन' कधी रिलीज होणार? (Chandu Champion Release Date)


साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट 14 जून 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यन लवकरच 'भूल भुलैया 3'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात कार्तिकसह तृप्ती डिमरी आणि विद्या बालनदेखील दिसणार आहेत. अनीस बज्मीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


कार्तिक आर्यन शेवटचा 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem ki Katha) या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात तो अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत (Kiara Advani) स्क्रीन शेअर करताना दिसला. आता अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan : घाटकोपर होर्डिंग अपघाताने कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या नातेवाईकाचे निधन