Rajkummar Rao and Janhvi Kapoor :  जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि राजकुमार राव ( Rajkummar Rao) यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कारण बहुप्रतिक्षित 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr and Mrs Mahi )  या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आयपीएल सामन्यादरम्यान या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. त्यामुळे हा सिनेमा देखील तितकाच हटके असणार असल्याचा अंदाज सध्या प्रेक्षकांकडून वर्तवला जातोय. अलीकडेच ‘श्रीकांत’ मधल्या दमदार  परफॉर्मन्स देणाऱ्या राजकुमारने त्याच्या आणि जान्हवीच्या केमिस्ट्रीबद्दल प्रेक्षकांना वेड लावले आहे. 


सोशल मीडियावरुन या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा हा दुसरा सिनेमा आहे. दोघांनी यापूर्वी 'रुही'मध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली होती. शरण शर्मा दिग्दर्शित मिस्टर आणि मिसेस माही हा सिनेमा 31 मे रोजी रिलीज होणार आहे. करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.


 कसा आहे सिनेमाचा ट्रेलर?


2 मिनिट 55 सेकंदाच्या हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळतंय. ट्रेलरची सुरुवात जान्हवी आणि राजकुमार यांच्या प्रेमकथेने होते. या ट्रेलरमध्ये त्यांची पहिली भेट आणि नंतर लग्न असा प्रवास दाखवण्यात आला आहे. यानंतर राजकुमार आपली पत्नी माहीसोबत क्रिकेटर होण्याचे स्वप्न कसे पूर्ण करतो,  या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात रोमान्ससोबतच खूप इमोशनही आहे. दरम्यान या सिनेमाची प्रेक्षकांना देखील बरीच उत्सुकता लागून राहिलीये. 31 मे रोजी ही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.                   


राजकुमार रावचे आगामी सिनेमे


याशिवाय 'श्रीकांत' आणि ' मिस्टर आणि मिसेस माही, राजकुमार देखील 'स्त्री 2' मध्ये 'विक्की' ची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' देखील याच वर्षी रिलीज होणार आहे. 






ही बातमी वाचा : 


Sharmishtha Raut : 'निर्माता म्हटलं की सगळ्यांना करण जोहर दिसतो पण...'; निर्माती म्हणून शर्मिष्ठा राऊतने शेअर केला अनुभव