Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सध्या चर्चेत आहे. अंमलबजावणी  संचालनालयाने (ED - Enforcement Directorate) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल केलं आहे.  अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीनं जॅकलिनला काही महागड्या भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तू कोणत्या ते जाणून घेऊयात....


सुकेशनं 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलंय. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. 


महागडी ज्वेलरी 
तसेच जॅकलिनला सुकेशनं महागडी ज्वेलरी देखील गिफ्ट म्हणून दिली आहे. या कलेक्शनमध्ये 15 लाखांच्या इअरिंग्सचा (कानातले) समावेश आहे. तसेच दोन डायमंड इअरिंग्स, कार्टियर बांगड्या आणि टिफनी ब्रेसलेट देखील जॅकलिनला सुकेशनं दिले.   


घड्याळं आणि शूजचं कलेक्शन 
रोलेक्स, रॉजर डुबुईस आणि फ्रँक मुलर या ब्रँड्सची घड्याळं जॅकलिनला सुकेशनं दिली. YSL,Gucci, Louis Vuitton, Louis Vuitton या ब्रँड्सचे शूज देखील सुकेशनं जॅकलिनला दिले. सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिनसाठी एक प्रायव्हेट जेट भाड्याने घेतले होते.


जॅकलीन व्यतिरिक्त, तिच्या आईला देखील सुकेशनं गिफ्ट्स दिले. त्यानं जॅकलिनच्या आईला Maserati आणि  Porsche या कंपनीच्या गाड्या भेट म्हणून दिल्या. तर जॅकलिनच्या बहिणीला म्हणजेच जेराल्डिन फर्नांडिसला सुकेशनं BMW X5 ही लग्झरी कार गिफ्ट म्हणून दिली. 


कोण आहे सुकेश चंद्रशेखर?


सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुतला एक उद्योगपती आहे. सुरुवातीला नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांची फसवणूक केली. 75 जणांचे 100 कोटी रुपये घेऊन त्याने पोबारा केला. वयाच्या 17 व्या वर्षी त्याला पहिल्यांदा अटक झाली. राजकारण्यांच्या नावाने सव्वा कोटी रुपये त्याने उकळले होते. कधी करुणानिधी, कधी कुमारस्वामी, कधी जयललितांच्या नावाचा वापर केला. 2017 मध्ये तामिळनाडूच्या राजकारणात त्याने डील करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगात ओळख असल्याचं सांगून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं आमिष त्यानं दाखवलं. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला 2017 मध्ये अटक केली आणि त्याच्या हॉटेल रुममध्ये सव्वा कोटी रुपये जप्त केले. पण त्यानंतरही सुकेशने दिल्लीतल्या तुरुंगातूनच खंडणी वसुली सुरु केली. सुकेशवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. 2013 मध्ये चेन्नईच्या कॅनरा बँकेलाही त्याने चुना लावला. या प्रकरणी त्याची गर्लफ्रेन्ड लीना मारिया पॉललाही अटक झाली. रवी पुजारी गँगने तिच्या ब्यूटी पार्लरवरही गोळीबार केला होता. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: